Uncategorized

प्रशासनाच्या निष्क्रियेताचा खा. प्रीतमताईंनी फाडला बुरखा, खासदार फंडातून सहा कोटींची कामे सुचवली, अडीच कोटींच्या कामांना मंजूरी, बीलं पास करण्यासाठी प्रशासन थोडेही सहकार्य करत नाही : खा. मुंडेंचा आरोप


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : निधी प्राप्त होवूनही जिल्हा प्रशासनातील काही कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी तो वेळेत खर्च करत नाहीत, याचा परिणाम थेटपणे जिल्ह्यावर होतो, जिल्हा प्रशासनाच्या अशाच निष्क्रिय कामाचा बुरखा खा. प्रीतमताई मुंडेंनी शुक्रवारी टराटरा फाडला आहे. ‘मी खासदार फंडातून जिल्हा नियोजनकडे सहा कोटींची कामे सुचवलेली असून यापैकी अडीच कोटींच्या कामांना मंजूरही मिळालेली आहे, विशेष म्हणजे यातील अनेक कामे पुर्ण होवूनही त्याची बीले पास करण्यासाठी प्रशासन थोडेही सहकार्य करत नाही, असा आरोप खा. प्रीतमताई मुंडेंनी केला आहे.
खा. प्रीतमताई मुंडे ह्या विकास निधी खर्च करण्यामध्ये नेहमीच पुढे राहिलेल्या आहेत. विकासासाठी खेचून आणलेल्या कोट्यावधींच्या निधीमुळे त्यांची जिल्ह्यात एक मोठी छबी तयार होत आहे. परिणामी केवळ खोडसाळपणातून त्यांची काही जण बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याअनुषंगानेच सातत्याने खासदार फंडाच्या खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत. अशा बातम्या पेरणार्‍यांची त्यांनी काल चांगलीच कानउघडणी केली याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रीयपणाचाही बुरखा यावेळी त्यांनी टराटरा फाडला आहे. ‘मी माझ्या फंडातून सहा कोटींचे कामे सुचविलेली आहेत. अडीच कोटींच्या कामांना मंजूरीही मिळालेली आहे, तर अनेक कामांची प्रशासकीय, काहींची तांत्रिक मान्यता होणे बाकी आहे, विशेष म्हणजे अनेक कामे प्रगतीपथावर तर अनेक कामे पुर्णही झालेली आहेत, असे असतानाही पुर्ण झालेल्या कामांची बिल काढण्यासाठी प्रशासन थोडेही सहकार्य करत नाही, निधीबरोबरच विकास कामे पुर्ण करण्यासाठी मी नेहमीच पाठपुरावा करते, जिल्हा नियोजन विभाग आमच्या कामात जाणून-बुजून कुचराई करत आहे, यावर आम्ही त्यांना जाब विचारला तर एजन्सीकडून निधीची मागणी आली नसल्याचे उत्तर त्यांच्याकडून देण्यात येत आहे. मग आता हाही विषय मी पंतप्रधानांकडे घेवून जायचा का?, खासदार फंडातील विकास कामे पुर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेचाही महत्वाचा रोल आहे, त्यामुळे केवळ यामध्ये एकाच व्यक्तीला दोष देवून इतरांनी स्वत:चे हात वरी करू नयेत, असेही यावेळी खा. मुंडे म्हणाल्या.

देशातील खासदारांच्या निधीची मागणी फक्त
खा. मुंडेंनीच संसदेत धरली होती लावून
दुसर्‍या टर्ममध्ये कोविडच्या संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल दोन वर्ष देशातील सर्वच खासदारांच्या निधीला स्थगिती दिली होती, दोन वर्ष पुर्ण होवूनही केंद्र सरकारने खासदार फंडाच्या निधीवरील स्थगिती उठविली नव्हती, यावेळी देशातून फक्त एकट्या खा. प्रीतमताई मुंडेंनीच खासदारांच्या या फंडावर संसदेत आक्रमक होवून आवाज उठवला अन् याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष वेधून घेतले होते, निधीबाबत खा. मुंडे ह्या किती आणि कशा तत्पर आहेत हे यातून स्पष्टपणे लक्षात येते, त्यामुळे कुचकामी यंत्रणेचे अपयश त्यांच्यावर ढकलणे हे योग्य नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!