वडवणी, दि. 17 ( प्रतिनिधी ) : शासनाने बाजारतळासाठी संपादित केलेली जागा खाजगी मालकीची दाखवून त्यावर वडवणीत अतिक्रमण केले आहे. गट नं. २१४ मध्ये हा प्रकार घडला असून यासाठी खोटी कागदपत्र तयार करून जमीन हडपली आहे. बनावट कागदपत्र तयार करून शासकीय जागा स्वतःची दाखवुन त्यावर अतिक्रमण करणाऱ्या सात घोटळेबाजांवर फौजदारी गुन्हा दाखल करून दोषींना जेलमध्ये टाका, अशी मागणी प्रेमचंद गुलाबचंद नहार यांनी पोलिसांकडे केली आहे. त्यांच्या या तक्रारीमुळे वडवणीत मोठी खळबळ उडाली आहे.
प्रेमचंद नहार यांनी या संदर्भात पोलीसांकडे पुराव्यासह फिर्याद नोंदविली आहे मात्र अजुनही पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही. त्यांनी दिलेल्या तक्रारीत आरोपी म्हणुन माणिकचंद हिरालाल नहार, शोभा माणिकचंद नहार, विनय माणिकचंद नहार, विवेक माणिकचंद नहार, वैभव माणिकचंद नहार, पुष्पा विनोदकुमार नहार आणि विनोदकुमार पन्नालाल नहार यांचा समावेश आहे. आत्ताचा गट क्र. २१४ हा पूर्वी सर्व्हे नं. १०८/२ असा होता. वास्तविकता ही जमीन गुलाबचंद पन्नालाल नहार यांच्या मालकीची होती. त्यावर कुलकर्णी नावाचे व्यक्ती कुळ होते. ही जमीन गावालगत असल्याने नंतर आठवडी बाजारासाठी संपादन करण्यासाठी निवाडाही झाला. यातुनच चिंचवण रोड जातो. चिंचवण रोड हा या जागेच्या मधुनच जातो. रोडच्या उत्तरेस या गट नंबरमधील बरीच जमीन राहिली. यावर ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अनेकांनी ताबा केला. यात माणिकचंद नहार व पुष्पा विनोदकुमार नहार यांनी एक बेकायदेशीर खरेदीखत नोंदविले. ही जागा शासकीय आहे. हे माहित असतानाही त्या ठिकाणी प्रकाश किराणा दुकान आणि सुरज एजन्सी नावाचा व्यवसाय सुरू केला आहे. अशा प्रकारे घोटाळेबाजानी शासनाची जागा बळकावली आहे. बनावट दस्त तयार करून शासनाची फसवुन करून लाभ मिळविला आहे, परिणामी सदर घोटाळेबाज कलम ४६८, ४७१, ४२० व ३४ भादवीप्रमाणे दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी प्रेमचंद नहार यांनी पोलिसांकडे केली आहे, विशेष म्हणजे तक्रारदार प्रेमचंद नहार यांनी अतिक्रमीत जमीन, चिंचवण रस्ता कसा जातो व आरोपींनी कशी जागा बळकावली आहे, याकडे पोलिसांचे लक्ष वेधत अतिक्रमण धारकाबाबत मा. उच्च न्यायालयाचा निकाल, जिल्हाधिकारी, बीड यांनी सुनावणी घेऊन दिलेला निकाल, पी. टी.आर. उतारे, स्थळपहाणी अहवाल, फोटो, असे सर्व महत्त्वाचे कागदपत्र पोलिसांना दिले आहेत. पोलीसांनी या तक्रारीप्रमाणे आरोपींना ताब्यात घ्यावे , चौकशी करून शासकीय जमीनीवरून हुसकावून लावून त्यांना जेलची हवा दाखवावी, अन्यथा कायदेशीर मार्गाने पुढील पाऊल उचलला जाईल, असा इशाराही प्रेमचंद नहार यांनी दिला आहे.
मा. संपादक साहेब,
दैनिक ——— बीड.
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रकाशित करावी, ही नम्र विनंती!
आपला
प्रेमचंद गुलाबचंद नहार, बीड