Uncategorized

मराठा आरक्षणासंदर्भात केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवले, बीडमध्येही गुणरत्न सदावर्तेवर गुन्हा दाखल



बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते हे दोन समाजात जाणिवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, असा तक्रारी अर्ज भाजपाचे स्वप्नील गलधर यांनी दिल्यानंतर गुणरत्न यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते हे कोणते ना कोणते वादग्रस्त मुद्दे उपस्थित करून समाजात तेढ निर्माण करत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातही त्यांनी वेगवेगळी वक्तव्य करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा असा तक्रारी अर्ज स्वप्नील गलधर यांनी दिला होता. त्यानुसार गुणरत्न यांच्या विरोधात कलम 153 (अ), 295 (अ), 505(2) भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदावर्ते यांच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. सध्या ते पोलिस कोठडीत असून त्यांच्यावर आता पुन्हा एक बीड येथे गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!