Uncategorized

फक्त स्वत:चं अपयश झाकण्यापलीकडे राज्य सरकारला दुसरं येतयचं काय?, जनता सुज्ञ आहे, ती आघाडी सरकारच्या भुलथापांना कधीच बळी पडणार नाही, बीडमध्ये विरोधकांवर निशाना साधून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी सांगितला केंद्र सरकार अजेंडा


बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : स्वत:चं अपयश झाकण्याच्या पलीकडे राज्य सरकारला दुसरे काहीच जमत नाही, मात्र या महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, ती आघाडी सरकारच्या कोणत्याच भुलथापांना कधीच बळी पडणार नाही, अशा शब्दात विरोधकांवर टिका करत यावेळी केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्र सरकारचा अजेंडा सांगितला.

केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार ह्या शनिवारी सायंकाळी बीडमध्ये दाखल झाल्या होत्या. येथील शासकिय निवासस्थानावर जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शहराध्यक्ष भगिरथ बियाणी, डॉ. लक्ष्मण जाधव यांच्यासह इतर भाजपच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. तर रविवारी सकाळी त्यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या तुकाराम नगरमधील राशी निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मस्के कुटुंबीयांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी त्यांनी बीडच्या पत्रकारांसोबत चर्चा करून भाजपचा अजेंडा माध्यमांसमोर मांडला, केवळ देशातील जनतेचे हित लक्षात घेवूनच मोदी सरकार काम करत आहे. गोर-गरिब वंचितांना आधार देण्याच्या अनुषंगाने प्रभावी अशा योजनाही राबविण्यात येत आहेत. आणि याच योजनांमुळे त्या नागरिकांना मोठा आधार मिळत आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या काही प्रश्‍नांनाही उत्तरे दिली. निकाला संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, की निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. आम्ही लुठल्याही यशाने हुरळून जात नाहीत आणि अपयशाने कधीच खचून जात नाहीत, अशी आमची भारतीय जनता पार्टी आहे. देशसेवेसाठी जे जे करता येईल ते केंद्र सरकार काम करत आहे. राज्य सरकारने काय काय केलं हे आपण पाहतच आहात. शेतकरी प्रश्नावर राज्य सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे, सध्या राज्य सरकार सगळं खापर केंद्र सरकारवर फोडत आहे स्वतः मात्र काहीच करायचं नाही, अशी भूमिका महाराष्ट्रात राज्य सरकारची आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वात जास्त लसीचे डोस पुरविले गेले, मोठ्या प्रमाणात बजेटही दिले. त्याच श्रेय मात्र घेतलं जातं परंतू ह्या सर्व गोष्टी सांगत असताना लोकांमध्ये भ्रम निर्माण केलं जातं हे दुर्दैव आहे, तसेच आज महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांवर राज्य सरकार सूडबुद्धीने कारवया करत आहे. मग नारायण राणे यांचे प्रकरण असेल की अन्य नेत्यांचे. केवळ त्रास देण्याचे काम आज राज्य सरकारकडून होत असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा, सौ जयश्रीताई मस्के, भगीरथ बियाणी, विजयकुमार पालसिंगणकर, शांतिनाथ डोरले, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, जाधव साहेब, हावळे सर, शिरुरे सर, अनिल चांदणे, पंकज धांडे, नरेश पवार, दुष्यंत डोंगरेनाना, विशाल पाखरे, नितीन आमटे, बाबा गव्हाणे, उद्धव आरे, लाला पन्हाळे, अजय ढाकणे, अमू जहागीरदार, राजेंद्र चरखा, महेश सावंत, बद्रीनाथ जटाळ, प्रल्हाद चित्रे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!