बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : झेडपीच्या सायकल खरेदीमध्ये मोठा घोटाळा होणार होता, कारण पाच हजाराची सायकल थेट सात हजारात खरेदी करण्याचा डावच अनेकांनी आखला होता, मात्र यावर दै. लोकाशाने 24 मार्चच्या अंकात एक वृत्त प्रकाशित करून झेडपी प्रशासनाचे लक्ष वेधले होते, त्यावर या वृत्ताची जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा सीईओ अजित पवार यांनी तात्काळ दखल घेतली आणि या एक कोटींच्या सायकल खरेदीचे जुने टेंडर तात्काळ रद्द केले, चुका करणार्यांना मी कधीच माफ करणार नाही, असे सांगत पवारांनी 1428 सायकल खरेदीसाठी नव्याने फेरनिवीदा मागविल्या होत्या, त्यांच्या या फेरनिविदेमुळे अनेकांचे बिंग फुटले असून आता सात हजाराला नव्हे तर 4951 रूपयांना एक सायकल खरेदी केली जाणार आहे. म्हणजेच आता एक कोटींच्या रक्कमेत 2010 सायकल मिळणार आहेत. पवार आणि दै. लोकाशाच्या या यशस्वी प्रयत्नामुळे जिल्ह्यातील तब्बल 600 विद्यार्थ्यांचे कल्याण तर होणारच आहे. मात्र सीईओ आणि दै. लोकाशाच्या या दणक्याने अनेकांचे मनसुबे पाण्यात विरघळले आहेत.
जिल्हा परिषदेमध्ये कोण कधी आणि कशा प्रकारे भ्रष्टाचार करेल हे निश्चित सांगता येत नाही, कारण असे एक ना अनेक घोटाळे आतापर्यंत उघडकीस आलेले आहेत. येणार्या काळात जि.प.च्या शाळेत शिक्षण घेणार्या अनुसुचित जाती, जमाती आणि दारिद्रेखालील अशा एकूण 1428 विद्यार्थींनींना सायकलचे वाटप केले जाणार होते, त्याअनुषंगानेच निवीदा मागविण्यात आल्या होत्या, मात्र यामध्ये मॅनेजिंकचा प्रकार सुरू असल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये जोर धरून होती, स्वत:च्या स्वार्थासाठी एका कंपनीला हे टेंडर मॅनेज करून देण्याचा प्रकार सुरू होता, या सर्व प्रकारावर 24 मार्च रोजी दै. लोकाशाने पहिल्या पानावर ‘झेडपीच्या सायकल खरेदीत मोठा घोटाळा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते, त्यावर दै. लोकाशात छापून आलेल्या या वृत्ताची जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा सीईओ अजित पवार यांनी तातडीने बैठक बोलावून सायकल खरेदीचे जुने टेंडर त्यांनी रद्द केले आणि यासाठी नव्याने फेरनिवीदा मागविल्या होत्या, त्यावर झेडपी प्रशासनाकडे नव्याने तिघांनी निविदा दाखल केल्या, त्यानुसार यातील एका कंपनीला सायकल खरेदीचे नव्याने टेंडर देण्यात आले आहे. सात हजाराऐवजी आता 4951 रूपयांना एक सायकल खरेदी केली जाणार आहे. म्हणजेच आता एक कोटींच्या रक्कमेत 2010 सायकल मिळणार आहेत. पवार आणि दै. लोकाशाच्या या यशस्वी प्रयत्नामुळे जिल्ह्यातील तब्बल 600 विद्यार्थ्यांचे कल्याण तर होणारच आहे. विशेष म्हणजे सीईओ आणि दै. लोकाशाच्या या दणक्याने अनेकांचे मनसुबे पाण्यात विरघळले आहेत.
लखनौच्या कंपनीला मिळाले टेंडर
यापुर्वी एक सायकल जवळपास सात हजार रूपयांना पालघरच्या कंपनीकडून खरेदी केली जाणार होती, या सगळ्या घोटाळ्याचा बुरखा दै. लोकाशाने टराटरा फाडला, आणि सीईओंनी जुने टेंडर रद्द करून नव्याने फेरनिवीदा मागविल्या, विशेष म्हणजे सीईओंनी इतर जिल्ह्यातील दरही तपासले होते, आता सायकल खरेदीचे टेंडर लखनौच्या कंपनीला मिळाले असून ती कंपनी 4951 रूपयांना एक सायकल देणार आहे.
सीईओंनी दै. लोकाशाचे मानले आभार
सायकल खरेदीमध्ये सुरू असलेल्या घोटाळा दै. लोकाशाने उघडकीस आणला, दै. लोकाशाच्या या एका बातमीमुळे जिल्ह्यातील तब्बल 600 गोरगरिब विद्यार्थ्यांचे कल्याण होणार आहे. याच प्रभावी पत्रकारितेबद्दल स्वत: सीईओ अजित पवारांनी दै. लोकाशाचे आभार मानले आहेत.
एक मेपर्यंत सायकल
विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणार
सायकल खरेदीचे टेंडर लखनौच्या कंपनीला दिले आहे, सगळी कागदपत्राची प्रक्रिया पुर्ण झालेली आहे, त्यानुसार सदर कंपनीनेही सायकल पुरवठा करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. येत्या एक मेपर्यंत सर्व सायकल संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतील, असे नियोजनही करण्यात आले आहे.