मुंबई, दि. 8 : औरंगाबाद ग्रामीणच्या तत्कालिन पोलिस अधीक्षक तथा औरंगाबाद लोहमार्गच्या विद्यमान पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांना राज्यात सर्वोकृष्ट पोलीस युनिट 2020 औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस’ या करिता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मोक्षदा पाटील, तत्कालिन पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांचे नेतृत्वामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद ग्रामीण यांनी जानेवारी-2020 ते डिसेंबर-2020 या कालावधीत पोलीस महासंचलाक कार्यालय, म.रा. मुंबई यांचे द्वारे राज्यातील पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयांचा तपास, कायदा सुव्यवस्था राखणे इत्यादी मापदंडाचे आधारे पोलीस घटकांचे कामाचे मुल्यांकन निकषाद्वारे सकारात्मक, नकारात्मक मापदंड द्वारे जानेवारी-2020 ते डिसेंबर-2020 या कालावधीत दाखल गुन्हयांची व वार्षिक गुन्हेगारीच्या आधारावर पोलीस महासंचालक कार्यालयाकडुन श्रेणी तयार करण्यात येऊन घटक कार्यालयाची A इ, उ अशा तिन श्रेणी मध्ये विभागणी करण्यात आली होती, यामध्ये Aश्रेणी मध्ये 24 घटक कार्यालये तर इ श्रेणी मध्ये 24 घटक कार्यालयांची निवड करण्यात आली होती. या नमुद तीन वेगवेगळया श्रेणीतुन सर्वोकृष्ट पोलीस घटक विविध मापदंडाचे आधारे मुल्यांकन समितीद्वारे पडताळणी करण्यात आली होती. या संपुर्ण निकषावर उत्तम कामगिरी करत संपुर्ण राज्यातुन सर्व श्रेणीमध्ये सर्वोकृष्ट पोलीस घटक म्हणुन पोलीस महासंचालक कार्यालयाचे मुल्यांकन समितीने पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद ग्रामीण यांची निवड करून घोषीत केले होते. या बाबत शुक्रवारी मा. पोलीस महासंचालक कार्यालय,मुबंई येथे आयोजित समारंभात मा. मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक लोहमार्ग औरंगाबाद यांचे या उल्लेखनिय कामगिरी बाबत मा. दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री, म.रा. मुबंई यांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे कामाचा गौरव करण्यात आला आहे. सर्वोकृष्ट पोलीस घटक निवडी करिता1) गुन्हे तपास 2) गुन्हे निर्गती 3) दारुबंदी/ जुगार कारवाई 4) सायबर 5) Aलींळेप रसरळपीीं हरलर्ळींीरश्र ेषषशपवशीी 6) Aलींळेप रसरळपीीं ळश्रश्रशसरश्र रलींर्ळींळींळशी 7) पाहिजे/ फरारी आरोपी अटक 8) दुर्बल घटकांविरूध्दच्या गुन्हयांची निर्गती 9) मिळुन न आलेले हरविलेले व्यक्ती 10) खढडडज 11) समन्स वाँरट बजावणी 12) दोषसिध्दी 13) रस्ते अपघात व मृत्यु दर 14) मुद्देमाल निर्गती 15) प्रलंबीत पासपोर्ट पडताळणी 16) श्वान व अंगुलमुद्रा पथक गुणवत्ता तसेच प्रशासकिय श्रेणी मधील मापदंड 1) परेड 2) सेवा पुस्तिका व शेरे 3) प्रलंबित पेन्शन प्रस्ताव 4) प्रलिंबित प्राथमिक व विभागीय चौकशी 5) गैरपगारी अनुदान वापर 6) प्रलंबित वैद्यकिय देयके 7) सेवाअंतर्गत प्रशिक्षण 8) पदोन्नती शींल हे मापदंडे ठेवण्यात आले होते. या सर्व निकषावर पोलीस अधीक्षक कार्यालय,औरंगाबाद ग्रामीण यांची कामगिरी ही सर्वोकृष्ट असुन त्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडुन सर्वोकृष्ट पोलीस घटक म्हणुन गौरविण्यात आले होते.
त्याअनुशंगाने पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.















