बीड प्रतिनिधी
भारत मातेला पुर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली.गोर-गरीब, कष्टकरी जनतेचे सबलीकरण करून अखंड भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पूर्ण होत आहे. आज जगातीक घडामोडीत भारत देश सक्षम व ताठ मानेनं उभा आहे.संकटगस्त देशांना भारताच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहे. विश्व गुरुची भुमीका भारताने निभवावी हि अनेक विकसनशील राष्ट्रांची मानसीकता आहे. कणखर व राष्ट्राभिमानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विश्वगुरूचे स्वप्न पुर्ण करेल.असा विश्वास डॉ. सुभाष जोशी यांनी व्यक्त केला.
भाजपच्या 42 वर्धापन दिनानिमित्ताने भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व प्रदेश उपाध्यक्षा खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्षयोद्धा भाजपा संपर्क कार्यालय बीड येथे भाजपा जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र मस्के, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात जनसंघ ते भारतीय जनतापार्टी पक्ष विस्तारासाठी कार्यरत असणारे शहरातील जेष्ठ सर्वश्री आदिनाथराव नवले पा. अँड सत्यनारायण लोहीया, डॉ.सुभाष जोशी, ऍड.बाळासाहेब बाहेगव्हाणकर, प्रा.रामचंद्र मुळे, बाळकिसन सिकची, विजयकुमार पालसिंगणकर, गजानन जगताप, दत्ता नलावडे,शिवाजी आप्पा मुंडे, नेवडेकाका, यांच्या यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला. सुरवातीला जेष्ठांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पुजन व ध्वजाला वंदन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
अध्यक्ष भाषणात बोलताना राजेंद्र मस्के म्हणाले कि,भारतीय जनतापार्टीचा ज्वलंत इतिहास प्रेरणादायी आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी,लोकनेते गोपीनाथराव मुंडे, प्रमोदजी महाजन यांच्यासारखे कर्तुत्ववान नेत्यांच्या समर्पित सेवेमुळे आणि हजारो कार्य्क्रत्यांच्या संघर्षातून भारतीय जनता पार्टीला आज यशाचे शिखर गाठता आले. देशातील सामान्य जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त करून देशाची धुरा भाजपकडे सोपवली. भाजपाने अंत्योदयाचे धोरण हाती घेऊन सामान्य जनतेच्या हितासाठी नवनवीन योजना आखल्या. आत्मनिर्भर भारताचा संकल्प करून त्या दिशेने देशाची वाटचाल चालू आहे. प्रत्येक घटकाचा सर्वांगिन विकास हा भाजपाचा ध्यास पूर्ण करण्यासाठी भाजपाने समृद्ध राष्ट्र निर्माणाचा पाया रचला. असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले.या वेळी
या वर्धापन कार्यक्रमास सर्जेरास तात्या तांदळे, नवनाथ शिराळे,प्रा. देविदास नागरगोजे, विक्रांत हजारी, सलीम जहांगीर, चंद्रकांत फड, डॉ. जयश्री मुंडे,भगीरथ दादा बियाणी, डॉ.लक्ष्मण जाधव,अजय सवाई, संग्राम बांगर, अशोक लोढा जि.प.सदस्य,किरण आबा बांगर, सरपंच राजाभाऊ गवळी,अनिल चांदणे,नागेश पवार, विलास बामणे, शांतीनाथ डोरले, बालाजी पवार, हरीश खाडे, संदीप उबाळे,सचिन उबाळे,भूषण पवार, शहाजी गायकवाड,संजय नलावडे, दुषंत डोंगरे, सखाराम सानप,विठल ठोकळ, संभाजी सुर्वे, मीराताई गांधले, छाया मिसाळ, जयश्री रणसिंग,संध्या राजपूत,प्रीत कुकडेजा,शैलजा मुसळे,शरद बडगे, मनोज ठाणगे,बाबूलाल ढोरमारे, संतोष गवळी, रामप्रसाद राऊत, सतीश कलसुळे, आबा येळवे, गणेश तोडेकर, नरेश पवार,घोलप मामा, दिलीप डोंगर,नितीन आमटे, रवी कळसाने, कल्याण पवार,राकेश बिराजदार, अजय ढाकणे, महेश सावंत,जालिंदर धांडे,बद्रीनाथ जटाळ, ऋषी फुंदे, आमु जहागीरदार,मोहसीन पठाण,पंकज धांडे,प्रल्हाद चित्रे,बंडू मस्के,बाबा गव्हाणे, विकास घीगे,शहादेव मस्के,चव्हाण टेलर, सचिन आगाम, अनिल शेळके, गवळीराम इंदोरे,आदि कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थित होते,
यावेळी माजी.आ. आदिनाथराव नवले, अँड सत्यनारायण लोहीया, अँड सर्जेराव तांदळे, प्रा. देविदास नागरगोजे, सलीम जहांगीर,यांनी उपस्थितांना संबोधित केले.प्रास्ताविक शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी केले तर, आभार प्रदर्शन अजय सवाई यांनी केले.व सूत्र संचलन मारोती तीपाले यांनी केले.
चौकट- तालुक्यातील पिंपळनेर येथील सरपंच पदी भाजपाचे कार्यकर्ते राजेभाऊ गवळी यांना सरपंच पदाची संधी मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
-या समारंभासाठी भारतमाता व कमळ यांचे भव्य चित्र रांगोळीच्या मध्यमातून रेखाटण्यात आले होते.
- भारतीय जनता पार्टीचे कालवश झालेले नेते, कार्यकर्ते यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
- राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.