बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : उद्या दि. 6 एप्रिल रोजी बोरखेड (ता.बीड) येथील बोरखेडे वस्ती ते राणूभवानी फाटा या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन बीड जिल्ह्याच्या खा. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जि.प.सदस्य अशोक लोढा यांनी केले आहे.
सन 2019 मध्ये तत्कालिन ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी मौजे बोरखेड येथील बोरखेडे वस्ती ते राणू भवानी फाटा किमी 0/00 ते 4.330 हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर केलेला होता. कोविडमुळे आतापर्यंत काम झालेले नव्हते. या कामासाठी बीड भाजपचे तात्कालिन जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जि.प.सदस्य अशोक लोढा, जि.प.चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र मस्के, यांनी व बोरखेड येथील बाळासाहेब गावडे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यानुसार उद्या दि. सहा एप्रिल रोजी बीड जिल्ह्याच्या विकासप्रिय खा. प्रीतमताई मुंडे यांच्या शुभहस्ते तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या अध्यक्षतेखाली व भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष रमेश पोकळे, अशोक लोढा, भाजपचे ज्येष्ठ नेते नवनाथ शिराळे, सर्जेराव तांदळे, स्वप्निल गलधर, बाळासाहेब मोरे यांच्यासह इतर पदाधिकार्यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे भुमिपुजन सकाळी आकरा वाजता बोरखेडे वस्ती (ता.बीड) येथे संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास परिसरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अशोक लोढा, बाळासाहेब गावडे, सरपंच विलास गावडे, उपसरपंच संतोष बोरखेडे यांनी केले आहे.