Uncategorized

घाटनांदुर येथे रेल्वे स्टेशन मास्तरचे ऱ्हदयविकाराच्या धक्याने निधन

घाटनांदुर/प्रतिनिधी:
अंबाजोगाइ तालुक्यातील एकमेव रेल्वे स्थानक असलेल्या घाटनांदुर येथील रेल्वे स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत असलेले बिहार राज्यातील रहिवासी मुसाफिर सिंग (वय: ५१) हे दि. २७ च्या रात्री कर्तव्या वर असताना दि. २८ च्या पहाटे ते मयत अवस्थेत आढळून आले.

घाटनांदुर रेल्वे स्थानका तुन जाणाऱ्या व येणाऱ्या गाडी ला सिग्नल न मिळाल्याने रेल्वे फाटकातील कार्मचारी याने रेल्वे स्थानकात जाउन पाहिले असता मुसफिर सिंग यांचा मृतदेह दिसुन आला. शव विछेदना साठी मृत देह अंबाजोगाइ च्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात पाठवन्यात आला आहे. दरम्यान घाटनांदुर येथील रेल्वे स्थानकात ते एकटेच कार्यरत असल्या मुळे त्याना वैद्यकीय उपचार वेळेत मिळाले नाहीत.
किमांन दोन कर्मचारी कार्यरत करने गरजेचे आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!