बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र लवकरच सुरू होणार आहेत. यासंदर्भात मंगळवारी आ. नमिता मुंदडांनी अधिवेशनात केलेल्या मागणीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे.
आ. नमिता मुंदडा ह्या अत्यंत चतूर आणि हुशार आहेत, त्यांच्या या चतूराईचा बीड जिल्ह्याचा मोठा फायदा होत आहे. कारण त्यांनी आतापर्यंत जे जे प्रश्न उचलून धरले ते ते खर्या अर्थाने मार्गी लागलेले आहे. अगदी याच प्रमाणे मंगळवारी त्यांनी बीड जिल्ह्यातील बंद असलेल्या सेतू केंद्राविषयी विधानसभेत प्रश्न मांडला. या वेळी राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी सेतू केंद्र सुरू करण्यासाठी लागणारी प्रक्रिया पुढील तीन महिन्यात पूर्ण करू, असे सांगितले आहे. त्यानुसार आता बीड जिल्ह्यातील सेतू केंद्र सुरू होण्याचा आशावाद निर्माण झाला आहे.