Uncategorized

बीडचा पुरवठा विभाग झोपेतच, डीवायएसपी राठोडांनी काळ्या बाजारात जाणारा राशनचा आणखी एक ट्रक पकडला, ट्रकमध्ये तांदळाचे सापडले 504 पोते, मागच्या आठ दिवसांपुर्वी त्याच मालकाचे धान्याचे पकडले होते 407 पोते, महसूल विभागाला पत्र व्यवहार करूनही पुढील कारवाई होईना


गेवराई, दि. 13 (लोकाशा न्यूज) : माजलगावकडून बीडकडे जात असताना एका ट्रकवर पोलिस उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांच्या पथकाने हात दाखवला, मात्र तो थांबवला नाही, त्यावर संशय आल्याने सदरचा ट्रक पाठलाग करून पुढे ताब्यात घेतला, यामध्ये राशनचा तांदूळ असल्याचे निर्दशनास आले. या कारवाईत लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष मागच्या आठवड्यातही याच मालकाचा राठोड यांनी राशनचा एक ट्रक पकडला होता, यामध्ये 404 गोण्या मिळून आल्या होत्या, हे दोन्ही ट्रक गेवराई पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भात कारवाई करण्यासाठी राठोड यांनी महसूल विभागाला पत्र लिहलेले आहे, तरीही त्यांच्या पत्राची अद्याप दखल घेतली गेलेली नाही, यावरूनच बीडचा महसूल विभाग अद्यापही झोपतच असल्याचे समोर येत आहे.

या बाबत अधिक माहिती अशी, की गेवराईचे पोलिस उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांच्या पथकाला गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की नांदेडवरून (एम. एच. 26 एडी 7717) आलेल्या ट्रकमध्ये अनाधिकृत राशनचा तांदूळ घेऊन जात होता, त्यानुसार उपअधीक्षक पथकातील कर्मचार्‍यांनी राष्ट्रीय महामार्ग गढीवर सदर गाडीला हात देऊन थांवण्याचा प्रयत्न केला परंतू सदरचे वाहन हे पलायन करण्याच्या तयारीत होते मात्र वेळीच सावधगरी बाळगून तो ट्रक पथकातील कर्मचार्‍यांनी पकडला व त्यामध्ये 50 किलोचे 504 पोते आढळून आले, तसेच हा ट्रक जप्त करण्यात आला असुन या कार्यवाईत लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व तो गेवराई पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश गेवराई पोलिसांना देण्यात आले असल्याची माहीती उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी दिली आहे. विशेष मागच्या आठवड्यातही याच मालकाचा राठोड यांनी राशनचा एक ट्रक पकडला होता, यामध्ये 404 गोण्या मिळून आल्या होत्या, हे दोन्ही ट्रक गेवराई पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भात कारवाई करण्यासाठी राठोड यांनी महसूल विभागाला पत्र लिहलेले आहे, तरीही त्यांच्या पत्राची अद्याप दखल घेतली गेलेली नाही, यावरूनच बीडचा महसूल विभाग अद्यापही झोपतच असल्याचे समोर येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!