माजलगाव, दि. 12 (लोकाशा न्यूज) तेलगाव रस्त्यावर असलेल्या टालेवाडी येथील साक्षी भारत बडे वय 12 वर्षे व सार्थक अशोक बडे वय 8 वर्षे हे भरत बडे यांच्या घरात खेळत असतांना छतामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने या दोघा सख्या चुलत बहिण-भावाचा मृत्यू झाला असल्याची घटना दुपारी घडली असावी असा अंदाज त्यांच्या घरच्यांनी वर्तवला आहे.
बडे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या
डीपी वरून मागील अनेक वर्षापासून करंट उतरत असल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. याबाबत गावातील नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना याबाबत वेळोवेळी कळवुन देखील त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. शनिवारी दुपारी हे दोघे चिमुकली बहिण भाऊ खेळत असताना त्यातील सार्थक हा छतावर जाण्यासाठी चढत असताना त्याला शॉक लागला असावा व त्यानंतर साक्षी ही त्याला पाहायला गेली असता तिला देखील करंट लागल्याने हे दोघे एकमेकांच्या अंगावर पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे गावकर्यांकडून सांगण्यात येत आहे.