बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यातील डोंगराळ भागातील एका खेडेगावातील दुर्धर आजारग्रस्त कुटुंब ज्यात आई, वडील, दोन मुली आणि एक मुलगा दुर्धर आजाराने ग्रस्त होते, कुटुंबातील आई आणि वडील अशिक्षित होते आणि रोज मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, मोठी मुलगी दीक्षा (नाव काल्पनिक आहे) ही नर्सिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती, मुलगा लखन आणि मुलगी दिप्ती ( नाव काल्पनिक आहे ) हे सातवी आणि दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते, मोल मजुरी करून का होईना अशातच 2021 मध्ये या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला, या कुटुंबातील खरा आधार असणारा बाप अल्पश्या आजाराने मृत पावला, याचा इतका धसका आईने घेतला कि चार महिन्यातच तिनेही या जगाचा निरोप घेतला. आता मात्र ही तीन भावंड निराधार होऊन या भावंडाचा आधार आता पूर्णपणे संपला आहे, या परिवारातील दीक्षा आज शिक्षण सोडून मोल-मजुरी करू लागली आहे, दोन्ही भावंडाची शाळा ही आता बंद करावी लागणार आहे. या भावंडांपैकी दिप्तीची तब्येत खूप नाजूक झाली आहे, तिला डॉक्टरने नगरच्या साई-ईशान या हॉस्पिटलमध्ये भरती करून तिच्यावर उपचार करणे चालू आहे. विहान प्रकल्पाच्या माध्यमातून ही बाब जि.प.बीड चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना समजली असता त्यांनी विशेष चौकशी करून या परिवाराला आधार जि.प.च्या माध्यमातून मिळेल असे सांगितले व त्यांनी त्याच क्षणी या परिवाराला मदत म्हणून स्वतःच्या बँक खात्यातून त्या परिवारासाठी 5000 रुपये तात्काळ जमा केले. या परिवाराची जिल्ह्यातील तसेच जिल्ह्य बाहेरील दानशूर व्यक्ती, संस्था, ट्रस्ट यांनी काही ना काही मदत करावी व या परिवाराला एक मदतीचा हात देऊन पुन्हा नव्याने उभा करावे, त्यांचा आत्मविश्वास वाढवावा असे आवाहन सीईओ अजित पवार आणि विहान प्रकल्प परिवार बीड यांनी केले आहे. आपणास या परिवाराबद्दल अधिक ची माहिती हवी असल्यास विहान प्रकल्प बीड चे प्रकल्प संचालक डॉ. राजन दहिवाळ -9011264999 , प्रकल्प समन्वयक स्मिता कुलकर्णी -7219643559 किंवा वॉर रूम जि.प.बीड चे श्री.महाडिक सर -9420228884 यांच्याशी संपर्क करू शकता. आपली मदत आपण कडा येथील एसबीआय बँकेच्या शाखेत दिपाली सीताराम साबळे यांच्या 62369751184 (आयएफसी कोड एसबीआयएन 0020297) या खात्यावर जमा करावित, असे आवाहन करण्यात आले आहे.