बीड,
अवैद्य वाळु उपसा व गोळीबार प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणविस प्रश्न उपस्थीत करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी चौकशी सुरू आहे दोषीवर कारवाई करण्यात येईल असे सांगीतले असता आ प्रकाश सोळंके यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थीत करून वाळु उत्खनन मटका गुटका दारू असे अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले या प्रकणी एस पी हे जबाबदार आहेत बदल्या व हप्ते वसुलीची वरिष्ठ अधिकारी कडुन चौकशी करावी व तात्काळ बदली करावी अशी मागणी केली.सखोल चौकशी करू व वाळु उपसा वर निर्बध आनण्यासाठी ११९ कारवाई करत १४७ लोकांवर कारवाई केली आहे व ईतर गुन्हे प्रकरणी योग्य कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगीतले . विशेष म्हणजे पोलीस अधिक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.
बीड एस पी वर कारवाई करा आ.नमिता मुंदडा
मागील काळात रसवंती समोरील अवैध दारू विक्री वरती झालेला गोंधळ व जिल्यातील वाढती अवैद्य धंदे पाहता पोलीस अधिक्षकांची अवैद्य पाठराखन केली जात असुन महिला आमदारा सोबत घडलेल्या घटणेची माहीती दिली असतांनाही पोलीस अधिक्षकांनी कसलीही कारवाई केली नाही यावर महिला आमदाराच्या सौरक्षणाची जबाबदारी कोन घेणार असे म्हणुन पोलीस अधिक्षकांना निलंबनाची कारवाईची मागणी आ विखे पाटील यांनी केली पोलीस अधिक्षकांच्या निलंबणासाठी विधानभवनात मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाकडुन आवाज उठवत घोषणाबाजी करण्यात आल्याने बीड जिल्हा लोकप्रतीनिधी सोबत बैठक घेऊन १५ दिवसात सदरील प्रकरणाची चौकशी करून अहवाल येताच कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लसक्षवेधी उत्तरात सांगीतले.
महिला आमदारांसोबत गैरवर्तन प्रकणी पोलीस प्रसासनाने गुन्हा दाखल प्रकरणी दिरंगाई केली असे सर्व दोषीवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे सभाग्रहात घोषीत केले.
बीड जिल्हा गुन्हेगारीवर विरोधी पक्षनेते देवेद्र फडणविस आ. राधाकृष्ण विखे पाटील आ. आशिश शेलार,आ,प्रकाश सोळके आ.नमिता मुंदडा व आ संदिप क्षीरसागर यांनी लक्षवेधीत सहभाग घेऊन पोलीस अधिक्षकावर कारवाईची मागणी केली.