परळी वैजनाथ दि ०४….
जेष्ठ नागरीक, दिव्यांगांना केंद्र सरकारकडून आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देणार्या “राष्ट्रीय वयोश्री” योजनेच्या नोंदणीचा जिल्ह्याचा शुभारंभ रविवारी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या योजनेचा दिव्यांग व जेष्ठ नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दि. 6 मार्च रोजी परळी वैजनाथ येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याच शिबीरात केंद्र सरकारच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा "राष्ट्रीय वयोश्री" योजनेच्या नोंदणीचा बीड जिल्ह्याचा शुभारंभ खा. डॉ. प्रितमताई मुंडे करणार आहेत. ही योजना दिव्यांग व जेष्ठ नागरीकांसाठी असुन नोंदणी केल्यानंतर त्यांना आवश्यक ते साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या नोंदणीसाठी आधारकार्ड, फक्त दिव्यांगासाठी ४० टक्के अपंग असल्याचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, २ पासपोर्ट फोटो, वार्षिक ८० हजार उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र (असेल तर ) या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. या योजनेचा गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
••••