Uncategorized

‘धारुर’ या उल्लेखाने पोलिसांनी लावला मृताच्या नातेवाईकांचा शोध; कर्नाटक व धारुर पोलिसांचे कौतूक

धारूर दि.4 मार्च – कर्नाटकातील बेळगाव येथे दवाखान्यात उपचारा दरम्यान निधन झालेल्या एका वृध्दाच्या नातेवाईकांचा शोध पोलिसांनी लावला. बेवारस अवस्थेत असलेल्या वृध्दाच्या तोंडून निघालेल्या ‘धारुर’ या शब्द उल्लेखावर कर्नाटक पोलिसांनी धारुर पोलिसांशी संपर्क साधल्याने मृत वृध्दाच्या कुटूंबियांचा शोध लागला. यामुळे कर्नाटक व धारुर पोलिसांचे कौतूक होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, एका वृध्दाचा बेळगाव ( कर्नाटक ) येथील दवाखान्यात निधन झाले. वृध्दासोबत कोणीही नव्हते. त्यामुळे दवाखाना प्रशासनाने याची खबर स्थानिक पोलीसांना दिली. त्यानंतर परिसरातील सर्व कारखान्यांवर ओळख पटविण्याचा प्रयत्न केला त्यातही यश आले नाही. त्यामुळे बेवारस म्हणून अंत्यविधी करण्याचा निर्णय झाला.
परंतु वृध्दाचे मृत्यूपूर्वीच्या ‘धारुर’ या शब्दाचा उल्लेख केला असल्याचे पोलीसांना माहिती मिळाली. कर्नाटक पोलीसांना धारुर ( जि. बीड ) पोलीसांना संपर्क साधून व मयताचा फोटो पाठवून हा व्यक्ती तुमच्या हद्दीतील आहे का ? अशी विचारपुस केली. यानंतर सपोनि विजय आटोळे यांनी सदर फोटो सर्व कर्मचाऱ्यांना पाठवून शोध घेण्यास सांगितले.

शोध घेत असलेल्या धारुर पोलिसांना तो व्यक्ती भगवान नागू पवार असून आडस येथील रहिवासी असल्याची ओळख पटली. त्या मृतदेहावर आज नातेवाईकांच्या उपस्थितीत आडस येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. कर्नाटक व धारुर पोलीसांच्या तत्परतेमुळे त्या वृध्दाची मृत्यू नंतर का होईना कुटुंबाची भेट झाली. त्यामुळे नागरिकांमधून पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण…
आडस (ता. केज) येथील भगवान नागू पवार यांचा मुलगा कर्नाटक राज्यातील कारखान्यावर उसतोडणीसाठी गेलेला आहे. याच मुलाला भेटण्यासाठी ते कर्नाटकात गेले होते. मुलाच्या प्रेमात भेटीसाठी गेलेल्या भगवान यांची मात्र मुलाची भेट होवू शकली नाही. आजारी पडलेल्या भगवान यांचा संकेश्वर येथील दवाखान्यात अखेर मृत्यू झाला.

बेवारस म्हणून अंत्यविधी करण्याचा पोलिसांचा निर्णय…
उस तोडणीसाठी सदरील गृहस्थ आलेला असावा म्हणून कर्नाटक पोलीसांनी सर्व कारखाने व ऊसतोड मजुरांच्या टोळीवर जाऊन ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. ओळख पटत नसल्याने शेवटी बेवारस म्हणून अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला होता. शेवटचा प्रयत्न म्हणून कर्नाटक पोलीस महेबुब यांनी धारुर पोलीसांना संपर्क केला.

मयत व्यक्तीचा फोटो पाठवून ओळख पटविण्याचे सांगितले अन्यथा दोन दिवसात आम्ही बेवारस मृतदेह म्हणून अंत्यविधी करणार असल्याचे सांगितले. फोटो मिळताच धारुर पोलीस ठाण्याचे प्रभारी (API) विजय आटोळे यांनी मयताचा फोटो सर्व कर्मचाऱ्यांना पाठवून ओळख पटविण्याचे सांगितले.

पोलिसांची कौतूकास्पद कामगिरी…
यानंतर आडस येथील शेख सलमान याने येथील घिसाडी समाजाच्या अनिल पवार यास फोटो दाखवला त्यांने ओळखून हे माझे चुलते असून भगवान नागु पवार असे नाव असल्याचे सांगितले. यांचा आम्ही व त्यांच्या मुलाने खूप शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही असे म्हणाला. त्यास आडस चौकीचे तेजस ओव्हाळ यांनी सर्व हकीगत सांगितली व कर्नाटक येथील पोलीसांशी संपर्क करून दिला.

ज्याला बेवारस म्हणत होते कर्नाटक व धारुर ( महाराष्ट्र ) पोलीसांच्या तत्परतेमुळे कुटुंब मिळाले. ज्या मुलाच्या प्रेमाखातर भेटण्यासाठी निघालेल्या वृध्दाला शेवटच्या क्षणी तरी अग्नी मिळाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. माहिती मिळताच नातेवाईक रात्रीच मृतदेह ताब्यात घेऊन आडस ( ता. केज ) कडे निघाले आहेत. आज शुक्रवारी भगवान नागू पवार यांच्या बेवारस म्हणून नव्हे तर स्वतः च्या गावात कुटुंबातील व्यक्ती अंत्यविधी करणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!