बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : भाजपच्या चित्रा वाघ ह्या फक्त आणि फक्त राजकारण करत आहेत. जेव्हा भाजपचे आमदार महिलांविषयी काहीही बोलतात तेंव्हा तुम्ही का गप्प असतात असा सवालच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या अॅड. प्रज्ञा खोसरे यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे.
स्वत:च्या पक्षातील नेत्यांनी कितीही चुका केल्या तरी त्यावर काहीच बोलायचे नाही, यातून चित्रा वाघ यांचे स्वार्थी राजकारण उघडे पडत आहे. स्वार्थी राजकारण करणार्या याच चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या अॅड प्रज्ञा खोसरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘जेव्हा भाजपचे आमदार महिलांविषयी काहीही बोलतात तेंव्हा आपण गप्प का असतात चित्राबाई..! आणि तुमच्या माहितीस्तव आयोगाचे काम हे अगदी उत्तम आहे, अध्यक्षांकडून प्रत्येक महिलेला न्याय मिळतो एक हे महिला म्हणून आम्ही ठामपणे सांगू शकतो, अशा शब्दात खोसरे यांनी वाघ यांच्यावर जोरदार टिका केली आहे.