बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री मा.नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने केंद्रातील सत्ताधार्यांच्या इशार्यावर बेकायदेशीररित्या अटक केले आहे. या विरोधात गुरूवारी (दि.24) रोजी आमदार संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत क्षीरसागर व अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष बरकत खान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ‘वुई सपोर्ट नवाब भाई’ म्हणत यावेळी सर्वांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते मा. नवाब मलिक यांना बुधवारी (दि.23) रोजी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी कडून चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले होते. परंतू थेट चौकशीतूनच अटक करत न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अटक करण्यापूर्वी कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना दिली गेलेली नाही. त्यामुळे झालेली अटक ही पुर्णतः बेकायदेशीर असून याविरोधात बीड राष्ट्रवादी-काँग्रेसचे आमदार संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत क्षीरसागर व राष्ट्रवादी-काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष बरकत खान यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भव्य निदर्शने केली व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गवते बापू, महादेव उबाळे, बाळासाहेब गुजर, के.के.वडमारे, रमेश चव्हाण, झुंजार धांडे, मामु गुत्तेदार, पंकज बाहेगव्हाणकर, पी.डी.देशमुख, लक्ष्मण विटकर, जयैतुल्ला खान,हेमाताई पिंपळे, प्रज्ञाताई खोसरे, विद्याताई जाधव, वाघमारे ताई,राणीताई बेग, अशपाक इनामदार, इरफान बागवान, बाजीराव बोबडे,राम वाघ, सचिन सोनवणे,सय्यद मुस्तफा, जयमल्हार बागल, राजीव महूवाले, सुशील जाधव, निखिल सवई, बाळासाहेब शिंदे, हेमराज शेख,शाहेद पटेल,सय्यद शारद, विपुल गायकवाड,जीवन सुतार,बब्बुभाई शेख, निखील शिंदे, भुषण कांडेकर, योगेश बहीरवाळ, अमोल माने यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.