Uncategorized

पहाटे 4.30 वाजता मंत्री नवाब मलिकांच्या घरी ईडीची धाड, चौकशीसाठी नवाब मलिकांना ईडी कार्यालयात नेले


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर ईडीनं पहाटे ईडी अधिकार्‍यांनी धाड टाकली, एका मालमत्तेच्या गैरव्यवहारावरुन ही कारवाई ईडीकडूनन करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. ईडीचे अधिकारी यानंतर नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊन गेले असून सकाळी 7.45 वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. ईडीचे अधिकारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांच्या घरावर पोहोचले. ईडीनं सकाळी सकाळी केलेल्या कारवाईमुळे चर्चांना उधाण आलं आहे. नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई सूडाचं राजकारण असल्याचा आरोपा मलिकांच्या समर्थकांनी केला आहे. नवाब मलिकांचे कार्यकर्ते आता मोठ्या संख्येनं ईडी कार्यालयाबाहेर पोहोचून त्यांना समर्थन देणार असल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी माध्यमांसोबत बोलताना ईडीच्या कारवाईमागे कोणत्याही प्रकारचं सूडाचं राजकारण नसल्याचं म्हटलं आहे. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाच्या बाहेर पोलिस फौजफाटाही वाढवण्यात आलेला आहे. दरम्यान नवाब मलिकांनी 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सरदार शहावली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून जमीन खरेदीचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून मलिकांचे पुत्र फराज मलिकांकडून जमीन खरेदीचा त्यांच्यावर आरोप आहे, कुर्ल्यातील मोक्याची 3 एकर जागा मलिकांचे पुत्र फराज मलिकांनी खरेदी केल्या,
30 लाखांतील जमीन खरेदीपैकी 20 लाखांचं पेमेंट केल्याचा मलिकांवर आरोप आहे, तसेच मलिक कुटुंबीयांच्या सॉलिडस कंपनीनं 2005 मध्ये शहावली आणि सलीम पटेलांकडून व्यवहार केल्याचा आरोप आहे. 2005 मध्ये कुर्ल्यातील जमिनीचा भाव 2053 रु. स्क्वेअर फूट होता मात्र खरेदी 25 रु. स्वेअर फुटांनी केली. जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेलच्या नावावर, विक्री सरदार शहा वलीच्या नावावर तर कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची असल्याचे आरोप आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!