परळी : राष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत मंजुर झालेल्या विहिरीचे बिल काढण्यासाठी लाभार्थ्यांकडून चार हजार रुपयांची लाच घेणारा परळी पंचायत समिती मधील कृषी विभागचे विस्तार अधिकारी संजय पालेकर यास बीड च्या एसीबी पथकाने रंगेहाथ पकडल्याचे समजते आहे.हि कार्यवाही एसीबी चे रविंद्र परदेशी व त्यांच्या टिमने केली असल्याचे वृत्त आहे. परळी शहरात गावठी रिव्हॉल्व्हर कार्यवाही ने अगोदरच खळबळ निर्माण झाली होती. आता एसीबी च्या ह्या कार्यवाहीने तर शहरात चर्चेला उधान आले आहे