परळी वैजनाथ दि २२ ( लोकाशा न्युज ) :- परळी शहरात गावठी रिव्हॉल्वर बाळगणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी शाखेचे भास्कर केंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धडाकेबाज कारवाई करीत तीन गावठी रिव्हॉल्वर जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अलीकडच्या काळामध्ये शहर पोलिसांची रिव्हाॅल्वर पकडण्याची ही तिसरी घटना आहे. ह्या घटनेने मात्र शहरामध्ये खळबळ माजली आहे.