बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : बीड विधानसभा मतदारसंघाचे आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून सध्या विविध विकास कामांचा धुम धडाका सुरू आहे. त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळणारा आमदार म्हणून त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजुरी जिल्हा परिषद सर्कल मधील 26 कोटी 83 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचा भुमिपुजन व लोकार्पण सोहळा आ.संदीप क्षीरसागर यांच्या शुभहस्ते आज रविवार दिनांक 13 रोजी संपन्न झाला आहे. या विकास कामाच्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.प्रा.सुनील धांडे, रवींद्र दादा क्षीरसागर, बबनराव गवते, वैजीनाथ तांदळे, सचिन शेळके, महादेव उबाळे, सौ.सारिका गवते यांची उपस्थिती होती.
या वेळी वैजनाथ नाना तांदळे यांनी आपल्या भाषणातून जमलेल्या सर्व जनतेला सांगितले की, राजुरी हा परिसर काकु नानाला माननारा आहे. राजुरी सर्कल मधील सर्व कामे मार्गी लावण्याची आ. संदीप भैय्यांना विनंती केली. पुढे बोलताना म्हणाले की शेतकर्यांचा आत्मा हा पाणी आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न भैय्यांनी मार्गी लावावा असे म्हटले आहे. बबन बाप्पू गवते यांनी म्हटले की राजुरी सर्कल मधील जनतेनी आम्हास निवडणुकीत खंबीर साथ दिली व आ.संदीप क्षीरसागर भैय्या यांनी 200 कोटीची विकास कामे सुरू केली आहेत. मतदार संघाच्या विकासासाठी भैय्यांना साथ द्या असे आवाहन केले. पुढे सुनील धांडे यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील सर्वात तरुण तडफदार आ.संदीप क्षीरसागर आहेत. राजुरी सर्कलमध्ये वैजनाथ नानाच्या रूपाने ढाण्या वाघ मिळाला.तुम्हाला दिलेला शब्द आमदार संदीप क्षीरसागर खाली पडू देणार नाहीत. व संदीप भैय्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा असे आवाहन केले. वंजारवाडी येथे आगमन झाले असता महिला भगिनींनी औक्षण केले. त्यावेळी पंचायत समितीचे आठवण आली असे आ.भैया म्हणाले.जनतेत प्रतिसाद चांगला मिळत आहे त्यामुळे येणार्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल आपलाच असेल असे भैया बोलताना म्हणाले. पंचायत समिती जिल्हा परिषद आमदारकीच्या निवडणुकीत राजुरी सर्कलने खंबीरपणे साथ दिली. आमदारांनी एक तरी मुरमाचे टोपले टाकले का? अशी उलट-सुलट चर्चा ऐकायला मिळत होती. कोविड च्या काळात शासकीय रुग्णालयात दिवसाला तीन तीन चार चार बैठका घेतल्या त्याच संकटकाळात रुग्णालयात रुग्णांना जेवण व्यवस्थित मिळते का नाही हे बघण्यासाठी स्वतः तिथे जेवण केले आणि विकास कामाचा पाठपुरावा केला आम्ही जनतेला लोकांसारखे पोकळ आश्वासन देत नाही तर ज्या काही जनतेच्या मूलभूत सुविधा आहेत या सर्व सुविधा मी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे असे आमदार भैय्यासाहेब म्हणाले. आम्ही आपल्या मतदार संघातील सेवा सहकारी सोसायट्या व ग्रामपंचायत स्वतःच्याच ताब्यात आहेत.
पुढे आमदार क्षीरसागर म्हणाले की, विरोधकांचा पंचवीस वर्षाचा काळ होता पण अशा प्रकारे कधी विकास कामे दिसली नाहीत आमदारकीच्या निवडणुकीदरम्यान जे काही शब्द दिले होते ते शब्द पुर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. शंभर कोटी 60 लक्ष रुपयांचे उद्घाटने केले आहेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शब्द दिला अजून रस्त्यासाठी 100 कोटी देतो विकास काम करून घे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर आज उद्घाटन केलेल्या रस्त्यांची कामे पुर्ण होणार आहेत. जनतेने मला संधी दिली त्यामुळे मी जनतेचे आभार व्यक्त करतो असे म्हणाले. राजुरी आणि वंजारवाडी वेगळी नाही त्यामुळे मी वंजारवाडी ला निधी कमी पडू देणार नाही मला माझ्या आयुष्यात सहज काही भेटले नाही सगळं काही मला स्वतःलाच घ्यावे लागले चालू असलेली गोष्ट मला मिळाली नाही कोणतीही गोष्ट दुरुस्ती करून घ्यावी लागते. माझे वडील बिन पगारी फुल अधिकारी होते. लोकांनी वंजारवाडी जवळील कारखाना चुरून खाल्ला आज कारखाना उभा करण्याचा प्रश्न माझ्या पुढे आहे. त्यामुळे कारखान्यावर कर्ज आहे कारखान्याची बॉडी बरखास्त आहे त्यामुळे कारखाना चालू करायला उशीर होईल पण मी चालू करणार आहे यावेळी वैजनाथ नाना तांदळे यांनी संदीप भैय्या यांना फेवर ब्लॉग बसून देण्याची मागणी केली होती तर आपल्या भाषणात संदीप भैय्यांनी मी फेवर ब्लॉक बसून देणार अशी ग्वाही दिली व मतदार संघात कुठे अडचण येऊ देणार नाही असेही सांगितले. येणार्या बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत 52 च्या 52 उमेदवार निवडून येणार आहेत. असा प्रतिसाद जनतेतून आहे असा लोकांचा माझ्यावर विश्वास आहे असे मत व्यक्त केले. आभार प्रदर्शन विशाल वैजनाथ तांदळे यांनी मानले.
चौकट
स्व.काकू-नानांनी राजकारणापेक्षा नेहमी समाज कारणाला अधिक महत्त्व दिले. स्व.काकू-नानांचा समाजसेवेचा वसा आणि वारसा घेवून आपली सेवा करत आहे. गजानन सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा ही वडिल रविंद्रदादांची व आणि या भागातील शेतकर्यांची,सर्वांचीच इच्छा आहे. कारखाना सुरू करण्यासाठी मी प्रयत्नशिल असल्याचे यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.