Uncategorized

वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्रासाठी आरटीओ अधिकार्‍याला धमकावले, बीड ग्रामीण ठाण्यात एजंटावर गुन्हा दाखल


बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : नियम तोंडून वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी चक्क येथील आरटीओ अधिकार्‍याला धमकावण्यात आले, याप्रकरणी सदर अधिकार्‍याने दिलेल्या फिर्यादीनुसार बक्शू शेख याच्यावर बीड ग्रामीण ठाण्यात कलम 353, 506 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, मी गणेश विघ्ने येथील आरटीओ कार्यालयात मोटार वहान निरीक्षक पदावर मागील सात महीन्यांपासुन कार्यरत आहे. दि. 9 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 03.40 वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे शासकीय कामकाज करत असतांना ईसम नामे बक्शु शेख हे माझ्याकडे आले व माझ्या शिकाऊ आनुज्ञप्तीचे काम तुम्ही केले नाही, अशी विचारना करू लागला, त्यावर तुम्ही कशा विषयी बोलत आहात मला कळले नाही, असे मी त्यांना सांगितले व मी त्यास म्हणालो मी आता जेवण करण्यासाठी चाललो आहे, ‘तुम्ही आर्ध्या तासानंतर या’ यावर बक्शु शेख याने माझ्या प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय मी तुम्हाला जेवायला जावू देनार नाही, या कार्यालयामध्ये मी मागील तीस वर्षापासुन काम करत आहे. खोट्या तक्रारी करून तुमच्याकडुन कसे काम करून घ्यायचे हे मला चांगले माहीत आहे, असे म्हणुन वाहन क्र. एमएच 13 एएन 0900 चे योग्यता प्रमाणपत्र का दिले नाही, असे म्हणाला, त्यावर मी त्यांस सांगितले की सदर वाहानाचे रिप्लेक्टर सर्टफिकेटची मुदत संपलेली आहे, त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र देता येणार नाही तसेच त्या वाहनाशी तुमचा काही संबंध नाही, तुम्ही ऊगाच त्यासाठी मला का त्रास देतात यावर बक्शु शेख म्हणाला की तुम्ही बर्‍या बोलाणे त्या वाहनाचे योग्यता प्रमाण पत्र द्या, अन्यथा जसे तुमच्यातल्या एकाला आत्ताच कामला लावले तसेच तुम्हालाही लाविन, असे म्हणाल्याने माझ्या लक्षात आले की बक्शु शेख हे अप्रत्यक्षपणे लाचलुचपत विभागाकडे माझी खोटी तक्रार करण्याची धमकी देत आहे, म्हणुन मी त्यास पुन्हा समजावुन सांगितले की रिप्लेक्टर सर्टफिकेट असल्या शिवाय मी योग्यता प्रमाण पत्र देवु शकत नाही, तुम्ही चुकीच्या व आयोग्य कामासाठी माझ्यावर दबाव आणु नका, व लाचलुचपत विभागात खोटी तक्रार देण्याची धमकी देवु नका असे म्हणालो तरीही बक्शु शेख यांनी मला तुम्हाला त्या गाडीचे योग्यता प्रमानपत्र द्यावेच लागेल नाहीतर एकाचा बळी घेतला तसा तुमचाही घेईल असे म्हणाला, त्यावर 9 फेब्रुवारी 2022 रोजी 03.40 वाजता मी शासकीय कामकाज करत असतांना ईसम नामे बक्शु शेख (रा. बीड) याने लाचलुचपत विभागात माझ्या विरूध्द खोटी तक्रार करण्याची धमकी देवुन माझ्याकडुन खोटे व चुकीचे काम करून घेण्यासाठी दबाव आणला व माझे शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणुन विघ्ने यांनी बीड ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बक्शू शेख याच्यावर बीड ग्रामीण ठाण्यात 353, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!