औरंगाबाद, दि. 7 (लोकाशा न्यूज) : हर्सूल जेलमध्ये शिक्षाबंदीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. अशोक रमेश जाधव, (वय-45 वर्षे, रा. मध्यवर्ती कारागृह औरंगाबाद सुरळी गाव,ता.गेवराई जि. बीड) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे हर्सूल जेलमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दुपारी 01.49 वाजेच्या सुमारास औरंगाबाद कारागृहातील जुने सर्कल 16,बॅरेक-07 येथे अशोक रमेश जाधव यांनी बॅरेक मधील शौचालयमध्ये पाण्याच्या लोखंडी पाईपला रुमलाच्या साहायाने गळफास घेतला. त्यास कारागृह वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केलेे. पुढील कारवाई करणे बाबत कारागृह पत्र प्राप्त झाल्याने अ.मृ. दाखल करून पुढील तपासकामी पोउपनि चव्हाण यांचेकडे देण्यात आली आहे. अशोक रमेश जाधव यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी हर्सूल पोलिस पुढील तपास करीत आहेत. कारागृहात शिक्षाबंदीने गळफास घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. गळफास घेतला की काही घातपात आहे ? याचा तपास पोलिस बारकाईने करत आहेत.