मुंबई : मधुरकंठातून अनेकांचे भावविश्व स्वरबद्ध करणार्या गाणसम्राज्ञी लता दिदींच्या निधनाने व्यथित आहे. आपल्या सुरेल व दैदिप्यमान गायनातून त्यांनी रसिक श्रोत्यांच्या मनात अढळस्थान निर्माण केले. सर्वांना मंत्रमुग्ध करणार्या अलौकिक स्वरांच्या शिदोरीतून त्या कायम स्मरणात राहतील, असे सांगत बीड जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे यांनी लतादिदींना श्रध्दांजली अर्पण केली.