Uncategorized

आता डॉ. अमोल गित्ते बीडचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ. गित्ते मंगळवारी पदभार स्विकारणार


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : डॉ. राधाकृष्ण पवार यांची बदली झाल्यानंतर बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी पद रिक्त होते. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार डॉ. शेख रौफ यांच्याकडे सोपविण्यात आला होता, वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी रौफ यांनी अत्यंत चांगल्या पध्दतीने पेललेली आहे. आता रिक्त असणार्‍या बीड जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. अमोल गित्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापुर्वी बुलडाणा, जालना आणि औरंगाबाद येथे उत्कृष्ट पध्दतीने कर्तव्य बजावलेले आहे. 2007 ते 2013 पर्यंत त्यांनी बुलडाणा जिल्ह्यात मेडीकल ऑफीसर म्हणून काम पाहिलेले आहे. 2013 ते 2015 दरम्यान जालना याठिकाणी आरसीएच ऑफीसर, 2015 ते 2018 यादरम्यान जालन्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी, 2018 ते 2020 मध्ये औरंगाबादचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. तर सध्या ते औरंगाबाद येथील आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य आहेत. शुक्रवारी त्यांची बीड जिल्हा आरोग्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ते सोमवारी किंवा मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!