Uncategorized

आ.संदिप भैय्यांनी मागणी करताच अजितदादांनी बायपास टू बायपास रस्त्यावरील ड्रेनेज व पोल शिफ्टींगसाठी दिले 10 कोटी


बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 52 अंतर्गत बायपास टू बायपास रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून यात ड्रेनेज व पोल शिफ्टींगसाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरेटीने तरतूद केलेली नाही. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी याच रस्त्यावरील ड्रेनेज आणि पोल शिफ्टींगसाठी जिल्हा नियोजनच्या राज्यस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्याकडे 10 कोटी रूपयांची निधीची मागणी केली. आ.संदिप भैय्यांनी बीडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अजितदादांसमोर मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता बैठकीतच दहा कोटी रूपये मंजूर केल्याचे सांगत तात्काळ नॅशनल अ‍ॅथॉरेटीकडून आलेल्या अंदाजपत्रकानुसार पोल शिफ्टींग व ड्रेनेज बाबत कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले.

शुक्रवार दि.21 जानेवारी रोजी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक सर्व साधारण सन 2022-23 ची राज्यस्तरीय बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान बीड जिल्ह्यासाठी वेळ देण्यात आला होता. यावेळी मुंबई मंत्रालय येथून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे सहभागी झाले होते. तर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून आ.संदिप भैय्या क्षीरसागर सहभागी झाले होते. यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी नॅशनल हायवे 52 अंतर्गत असलेल्या बीड शहरातील बायपास टू बायपासच्या 12 कि.मी.बाबत प्रश्न उपस्थित केला. सदर रस्त्याचे काम नॅशनल हायवेने मंजुर केले असून त्यामध्ये शहराच्या दोन्ही बाजुने प्रवेश करत असतांना 8 किलोमीटरचे डांबरीकरण व शहरातून जात असलेला 4 किलो मीटरवर सिमेंट रस्ता मंजुर केलेला आहे. नॅशनल हायवेने सदर रस्ता मंजुर करत असतांना शहरातील 4 किलो मीटरस्त्यावर दोन्ही बाजुने नाली बांधकामासाठी मंजुरी दिली नाही तसेच या दोन्ही रस्त्याच्या बाजुला विद्युत व्यवस्था ज्यामध्ये पोल शिफ्टींग व इतर बाबींचा समावेश आहे. त्यासाठी निधीची तरतूद केली नसल्याने शहरातील या रस्त्यासाठी नाली बांधकाम व पोल शिफ्टींगसाठी 10 कोटी रूपयांचा निधी विशेष बाब म्हणून देण्यात यावा अशी मागणी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी या राज्यस्तरीय बैठकीत केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित दादा पवार यांनी शहरातील महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यासाठी 10 कोटी रूपयांचा निधी मंजुर केल्याचे सांगत नॅशनल हायवेकडून आलेल्या या अंदाजपत्रकास संबंधित यंत्रणेने तात्काळ मंजूरी देवून काम हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, आ.संजय दौंड, जिल्हा नियोजन अधिकारी इगारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, महावितरणचे अधिक्षक अभियंता कोलप, कार्यकारी अभियंता गफाट, समाज कल्याण आयुक्त मडावी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
आ.संदिप भैय्यांचा बायपास टू बायपास रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा
बीड शहरातून जात असलेल्या नॅशनल हायवे 52 अंतर्गत बायपास टू बायपास रस्त्याच्या मंजुरीपासून काम पुर्ण होईपर्यंत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार, खा.सुप्रियाताई सुळे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या रस्त्याच्या ड्रेनेज, पोल शिफ्टींगसाठीही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी आता पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 10 कोटी रूपये खेचून आणले आहेत. तात्काळ निधी दिल्याबद्दल अजितदादा व पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आ.संदिप क्षीरसागर यांनी आभार मानले आहे.
चौकट
पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासाठी भरीव निधी
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासाठी अधिकचा निधी मिळाला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 साठी जिल्हास्तरावर 288 कोटी आराखडा तयार करण्यात आला होता. त्यास वाढीव व आवश्यक बाबी लक्षात घेता पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून 370 कोटी रूपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!