Uncategorized

वैद्यकीय शिक्षणातील ओबीसी आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत,असाच निर्णय राजकीय आरक्षणाबाबत लागावा – पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केली अपेक्षा

मुंबई ।दिनांक ०७।
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना २७ टक्के आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याला सुप्रीम कोर्टाने आज मंजुरी दिली, या निर्णयाचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले आहे, असाच निर्णय राजकीय आरक्षणाबाबतही लागावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. तसंच आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणालाही सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे.
हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नीट-पीजी समुपदेशन प्रक्रिया रखडली असल्याने ही प्रक्रिया लवरकच सुरू होणे महत्वाचे असल्याचं नमूद करत या प्रकरणावर कोर्टाने आज निर्णय दिला आहे. दरम्यान, पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे, पण त्याचबरोबर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीतही असाच निर्णय लागावा असे त्यांनी म्हटलं आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!