मुंबई ।दिनांक ०४।
ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्र एका थोर समाजसेविकेला मुकला आहे, त्यांच्या जाण्याने अनाथांची माय हरपली आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त केला आहे.
सिंधूताई आयुष्यात खूप खडतर संघर्षाला सामोरे गेल्या. संघर्ष करत करत त्यांनी अनाथ मुलांचे संगोपन केले, त्यांचं पालनपोषण केलं. हजारो अनाथ मुलांना त्यांच्या रूपाने आईचं प्रेम मिळालं. समाजसेवेच्या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. केवळ देशातच नव्हे तर जगात त्यांच्या कार्याची ओळख होती, त्यांच्या निधनाने हजारो अनाथ मुलांची माय हरपली आहे, कोरोना नसता तर त्यांचे अंतिम दर्शन घ्यायला जाऊ शकले असते..त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.
••••