बीड, दि.4 : शहरातील पेठ बीड पोलिस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि.4) मध्यरात्री सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करत नऊ जणांविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमावत यांच्या बीडमधील कारवाई खळबळ उडाली आहे.
हिरालाल चौक बीड येथील राणा चव्हाण यांच्या घरासमोरील पत्र्याचे शेडचे बाजूला लाईटचे उजेडात काही इसमांना एकत्र जमून जन्ना मन्ना अंदर बहार पत्त्याच्या जुगारावर पैसे लावून खेळवित आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांनी पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे केज येथील सपोनि.मिसळे व उपविभागीय कार्यालयाचे स्टाफला पाठवून मंगळवारी मध्यरात्री छापा मारला. यावेळी जन्ना मन्ना जुगार खेळणारे सात इसम जागीच मिळून आले व एक इसम पळून गेला. त्यांच्याकडून नगदी 93 हजार 830 रुपये व मोबाईल, दुचाकी असा एकूण 1 लाख 47 हजार 830 रुपयांचा माल जप्त करून एकूण 9 आरोपी विरुद्ध पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे यांची फिर्यादीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.संतोष मिसळे, पोहेका बालाजी दराडे, पोना रामहरी भडाने, राजू वंजारे, संतोष अहकरे, बडे, जावळे, संजय टूले यांनी केली.