Uncategorized

भाजप जिल्हाध्यक्षाच्या जागेत जुगाराचा अड्डा !पंकज कुमावतांचा दणका, पोलिसांची मोठी कारवाई , 47 जुगारी पकडले

बीड- भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेवर सुरू असलेल्या पत्याच्या आलिशान क्लबवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घातला.तब्बल 47 आरोपींसह मोठा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या तत्कालीन जिल्हाप्रमुख चे नाव गुटखा तस्करी मध्ये आले होते,आता भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या जागेत सुरू असलेल्या पत्याच्या क्लबवर धाड पडल्याने उडदा माजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे अस म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.
बीड शहरापासून जवळ असलेल्या चराटा रोडवर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेत आलिशान असा पत्याचा क्लब सुरू असल्याची माहिती गुप्त बतमीदाराकडून पोलिसांना मिळाली.गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुटखा,मटका,वाळू चे धंदे करणारे पंकज कुमावत यांनी आपल्या पथकासह या ठिकाणी रात्री उशिरा छापा घातला.
यावेळी तब्बल 47 जुगारी या ठिकाणी जुगार खेळताना आढळून आले.प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी 25 ते 30 चारचाकी आलिशान गाड्या मिळून आल्या.फॉरचूनर, इंडिव्हर,स्कार्पिओ अशा गाड्या,महागडे मोबाईल या कारवाईत पोलिसांनी जप्त केले.
एसकोर्ट क्लब या नावाने येथे सावंत आणि घोडके नावाचे लोक हा क्लब चालवत होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही जागा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीची आहे.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जागा मालक असलेले मस्के यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर देखील पंकज कुमावत यांनी गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर सेनेच्या प्रमुखांनी खांडे यांच्या पदाला स्थगिती दिली होती.आता भाजप जिल्हाध्यक्षाच्या जागेत सुरू असलेला जुगार अड्डा उद्धवस्त झाल्याने त्यांचे पक्षश्रेष्ठी काही कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!