बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : कुठल्याही लोकप्रतिनिधीचा आदर्श गुण म्हणजे लोकभावना व लोकआवाजाला प्रतिसाद देणे बीड नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी याच गुणाचा दाखला देताना गांधी नगर शेजारी असलेल्या प्रभाग 25 मधील स्वच्छता मोहिमेच्या हाकेला ओ देताना काल संपूर्ण यंत्रणा पाठवली व या भागातील नाल्या काढण्याचे काम सुरु केले . नगर परिषेदेच्या स्वच्छता विभागाला कामाला लावून येथील नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले असून येथील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
तेलगाव नाका बीड नजीक मुन्नवर नगर हुसैन कॉलनी मधील गल्ल्यातील नाल्यातील स्वच्छता अनेक दिवसापासून प्रलंबित होती , या भागातील युवकांना घेऊन स्वच्छता मोहीम आयोजित केली ज्याची सकारात्मक दखल घेऊन हेमंत क्षीरसागर यांनी येथील स्वच्छते साठी सूचना दिल्या व स्वच्छता कामगारांना या भागात कामाला लावले . आजवर आमच्याकडे कुणी लक्ष दिले नाही हेमंत क्षीरसागर यांनी आमच्या प्रश्नावर दखल घेतली या बद्दल नागरीकातून समाधान व्यक्त करण्यात आले . लियाकत भाई पठाण, शब्बीर हुसेन शेख , जावेद भाई बेग , जावेद पठाण, मोसिन पठाण , जमील शेख, अहमद टेलर, हाजी फयाज साहेब हाफिज नजीर साहेब, राजू भाई इनामदार, दौलत बेग, मुजीब सय्यद, राजू भाई बेग , उपस्थित जनसमुदाय शब्बीर हुसेन शेख ,जमील शेख मोसिन खानप्रदीप सुरवसेजमीर शेख अब्बास शेखलाईक बेग अशोक टकले नवनाथ कादे लियाकत पठाणशबिर शेख जावेद बेग जावेद पठाणअहमद टेलर हजी फयाझअजू शेखफयाज शेखनशीर शेख आदींनी आभार व्यक्त केले .
………………..
ते माझे कर्तव्य
शहरातील मुलभूत गरजा व प्रश्न सोडवणे हे माझे कर्तव्य आहे . आ संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात नगर परिषदेतील आमचे अधिकार कायम जनतेच्या प्रश्नावर काम करण्यासाठी आहेत . शहरातील नागरी सुविधा पुरवण्यासाठी आपण कटीबद्ध असून येणार्या काळात जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा माझा व माझ्या सहकार्यांचा प्रयत्न असेल असे हेमंत क्षीरसागर यांनी म्हटले आहे.