बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अनुभवी अभियांत्रिकी सल्लागार ई- निविदा दि. 13 डिसेंबर 21 रोजी प्रसिद्ध केली होती, सदरील ई- निविदेतील अनुभवी अभियांत्रिकी सल्लागाराची मुलाखत आज दि. 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.00 वाजता ठेवली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सायंकाळच्या वेळी मुलाखती ठेवण्यात आल्या असतील. राज्यातील बस सेवा बंद आहेत, ओमिक्रोनच्या प्रार्दुभावामुळे कलम 144 नुसार जमाव बंदी आहे. तसेच अभियंत्यांना कोणत्याही सूचना दैनिकात प्रसिद्ध नाहीत, तसेच मोबाईल, टपाल, ई-मेल संदेश नाहीत. यामुळे अभियंत्याचे अतोनात हाल होणार असून मुलाखतीस पोहचू शकणार नाहीत, व या प्रक्रियेतून वंचित राहतील, त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ठेवलेल्या ह्या मुलाखती रद्द कराव्यात अशी मागणी इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.
error: Content is protected !!