Uncategorized

सुमंत रुईकर कुटुंबियांना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिला आधाराचा शब्द,बाळांनो काळजी करू नका-माजीमंत्री क्षीरसागर

बीड/प्रतिनिधी

कडवट आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे सुमंत रुईकर यांचे नुकतेच निधन झाले,बीड ते बालाजी दर्शन साठी ते पायी निघाले होते वाटेतच त्यांचे दुर्दैवी निधन झाले त्यांच्या पश्चात वडील,पत्नी,मुलगी,मुलगा असा परिवार आहे,आज अंत्यविधी झाल्यावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रुईकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आधाराचा शब्द दिला नुसताच धीर नव्हे तर कायमचा आधार देऊ असे सांगून त्यांनी सुमंत रुईकर यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल शोक व्यक्त केला याच वेळी सुमंत रुईकर यांची कन्या आणि मुलगा माजी मंत्री क्षीरसागर यांच्या जवळ जाऊन बीलगले तेव्हा बाळांनो काळजी करू नका असा धीर देत रुईकर कुटुंबांना दुःखातून सावरण्याची शक्ती दिली सुमंत रुईकर यांची यावेळी म्हणाल्या की,आण्णासाहेब तुम्हीच आता आम्हाला उद्धवजी ठाकरे आहात,माझे कुटुंब उघड्यावर पडले आहे,5 जणांचा सांभाळ मला करावा लागणार आहे त्यामुळे तुम्हीच माझ्या कुटुंबाला सावरू शकता,यावेळी प्रा किशोर काळे,गणेश तालखेडकर यांनीही सुमंत रुईकर यांच्या कुटुंबाला केवळ धीरच नव्हे तर कायमस्वरूपी आधार द्यावा अशी विनंती केली तेव्हा काळजी करू नका सुमंत सारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे कुटुंब उघड्यावर पडू देणार नाही असा आधार देत माजीमंत्री क्षीरसागर यांनी त्यांचे सांत्वन केले यावेळी विलास बडगे,दिनकर कदम,नानासाहेब काकडे आदि उपस्थित होते

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!