केंद्रात सत्ता येताच नगर बीड परळी हा रेल्वे मार्ग पुर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 2828 कोटी रूपयांची तरतूद केली यापैकी 50 टक्के निधी केंद्र सरकार आणि 50 टक्के निधी राज्य सरकारने उचलला आहे. त्यानुसार मुंडे भगिणींनी दरवर्षी या रेल्वे मार्गासाठी निधी खेचून आणण्यास मोठे प्रयत्न केले आणि त्यामुळे रेल्वेच्या कामालाही खर्या अर्थाने गती मिळाली, राज्यात सत्ता येताच मागच्या दोन वर्षांपासून या प्रकल्पाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले, त्यामुळे राज्य सरकारकडे तब्बल पावणे चारशे कोटी थकले, या अडचणींवर मात करण्यासाठी खा. प्रीतमताई मुंडे यांनी सातत्याने आवाज उठविला, त्यांच्या आवाजामुळेच लवकरच बीड जिल्ह्यात रेल्वे धावणार आहे. यावरूनच खा. प्रीतमताईंच्या परिश्रमांचे चीज झाले असल्याचे बोलले जात आहे.