Uncategorized

बीड-म्हाळसजवळा-पिंपळनेर रखडलेल्या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी,15 कोटींचा निधी मंजूर,आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना मोठे यश

बीड (प्रतिनिधी):- बीड-म्हाळसजवळा-पिंपळनेर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या रस्त्याचा प्रश्‍न आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. या रस्त्याच्या कामासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून 15 कोटी रूपये हिवाळी अधिवेशनात मंजूर झाले आहेत. आ. संदीप यांच्या प्रयत्नाला हे मोठे यश मानले जात आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण व राज्यमंत्री दत्तामामा भरणे,बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे व महाविकास आघाडी सरकारचे आ. संदीप क्षीरसागर यांनी आभार मानत मानले आहेत.या रस्ता कामासाठीच्या तांत्रिक बाबी तातडीने पूर्ण करून
रखडलेल्या रस्त्याचे कामही गुणवत्ता पुर्ण करून घेवून अशी ग्वाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली आहे.

बीड-म्हाळसजवळा-पिंपळनेर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना व या भागातील नागरिकांना रस्त्यावरून चालणे ही अवघड झाले आहे. अपघाताचे प्रमाणही वाढले असून हा रस्ता तात्काळ करण्यात यावा यासाठी या भागातील शिष्ट मंडळाने अनेक वेळा आंदोलन केले. या रस्त्याच्या निधीसाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांची भेट घेतली. त्यांनीही या रस्त्याला तात्काळ निधी देण्याची सकारात्मक भूमिका घेतली होती.आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी या रस्त्याचा विहित नमुण्यातील प्रस्ताव सन 2021-22 या आर्थिक वर्षात डिसेंबर 2021 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समाविष्ट करण्याच्या कार्यक्रम रस्ते व पुल बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय,मुंबई यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग,बीड व अधिक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम मंडळ,उस्मानाबाद यांच्यामार्फत दाखल केला होता.या अधिवेशनात सदर रस्त्याच्या कामासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजुर होवून लवकरच त्याची निविदा प्रक्रिया पुर्ण होवून काम सुरू होईल. हे काम गुणवत्ता पुर्ण व्हावे यासाठी पुर्ण प्रयत्न राहतील. सध्या सुरू असलेले खड्डे बुजवण्याचे काम ही गुणवत्ता पुर्ण करून घेवू, या रस्त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली आहे.हा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार ही मानले आहेत.
चौकट
आधी काम करून घेवून मग आभार!
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी बीड-म्हाळसजवळा-पिंपळनेर रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे 15 कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली. ही मागणी केल्यानंतर या रस्त्यासाठी आंदोलन करणार्‍या शिष्ट मंडळाने दहा दिवसापूर्वी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे आभार मानत असल्याचे सांगताच आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी आधी काम करून घेवू, त्याची गुणवत्ता राखू आणि मगच आपले आभार स्विकारू असे मत त्यावेळी त्यांनी व्यक्त केले होते.
चौकट
नुसता शब्द नव्हे तर काम करूनच घेणार!
बीड-म्हाळसजवळा-पिंपळनेर रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे. या रस्त्यावर आधी कोणी काय केले यावर आपण काही बोलणार नाही. या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने हे काम प्रस्तावित केले आहे. त्यास 15 कोटी रूपयांच्या निधीची मागणीही केली आहे. या अधिवेशनात त्यास मंजुरी मिळेल, नुसता शब्द नव्हे तर काम करून घेण्यापर्यंत आमची जबाबदारी राहिल असे देखिल आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी म्हाळस जवळा रस्त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शिष्टमंडळास म्हटले होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!