बीड/चौसाळा, दि. 17 (लोकाशा न्यूज) : आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून चौसाळा जिल्हा परिषद सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी मिळाला आहे. या विविध 23 कोटी रूपयांच्या विकास कामांचे भुमिपुजन व लोकार्पण सोहळा रविवारी होणार आहे. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅड.डी.बी.बागल यांची विशेष उपस्थित राहणार आहे. खंडाळा,चौसाळा व रूईगव्हाण येथील कार्यक्रमास चौसाळा सर्कलमधील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.बाबु जोगदंड, सयाजी शिंदे, पी.वाय.जोगदंड सर, महावीर ढास यांनी केले आहे. रविवार दि.19 डिसेंबर 2021 रोजी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून चौसाळा जिल्हा परिषद सर्कलमधील 23 कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण होणार आहे. खंडाळा येथे सकाळी 9 वाजता, चौसाळा 10 वाजता, रूईगव्हाण 11 वाजता असा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते, राष्ट्रवादीचे नेते वैजीनाथ नाना तांदळे, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, माजी जि.प.सदस्य मदन जाधव यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थित राहणार आहे. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनातून मौजे खंडाळा ते ढोलेवस्ती रस्ता सुधारणा करणे. 1 कोटी 72 लक्ष, 2. वानगाव ते पैसावस्ती रस्ता सुधारणा करणे. 92 लक्ष, बोरखेड ते बोरखेडवस्ती गोलंग्री फाटा रस्ता सुधारणा करणे. 2.4 लक्ष, देवीबाभुळगाव ते जेबापिंप्री रस्ता सुधारणा करणे. (लोकार्पण), पिंपळगाव ते तेलपवस्ती-मानेवाडी रस्ता सुधारणा करणे. (लोकार्पण), सार्वजनिक बांधकाम विभागतुन अंजनवती-मोरगाव राममा 211 उदंडवडगाव-नेकनूर रस्ता प्रजिमा 34 कि.मी.5/00 ते 8/00 मध्ये सुधारणासह रूंदीकरण करणे. 200 लक्ष, बीड जिल्ह्यातील व तालुक्यातील रामा 55 ते म्हाळसजवळा-जरूड-येळंब-चौसाळा रस्ता प्रजिमा 32 कि.मी.558/00 ते 58/100 मध्ये सुधारणा करणे. 70 लक्ष, खर्डा-पाचंग्री-चौसाळा-साळेगाव-अंबाजोगाई-परळी रस्ता रामा 64 किमी 19/500 ते 23/500, 29/800 ते 30/600 व 36/200 ते 43/00 मध्ये सुधारणा करणे. 249 लक्ष, खर्डा-पाचंग्री-चौसाळा-साळेगाव-अंबाजोगाई-परळी रस्ता रामा 64 कि.मी.23/500 ते 25/600, 32/00 ते 32/200 (हिंगणी बु.) व 33/800 ते 34/00 (हिंगणी खु.), 39/900 ते 37/100 (जेबापिंप्री) व 40/00 ते 45/00 मध्ये सुधारणा करणे. 415 लक्ष, बीड जिल्ह्यातील हिवरसिंगा रामा 59 वडझरी-डोमरी-रोहतवाडी रामा 55 थेरला-सावरगाव-सोनेगाव-दासखेड-पाचंग्री-बोडखेवाडी-लोणीघाट रामा 64 वर ते बोरखेड-रौळसगाव-खडकीघाट-सावरगाव रस्ता प्रजिमा 19 कि.मी.40/300 मध्ये पुलाचे बांधकाम करणे. 150 लक्ष, बीड जिल्ह्यातील हिवरसिंगा रामा 59 वडझरी-डोमरी-रोहतवाडी रामा 55 थेरला-सावरगाव-सोनेगाव-दासखेड-पाचंग्री-बोडखेवाडी-लोणीघाट रामा 64 वर ते बोरखेड-रौळसगाव-खडकीघाट-सावरगाव रस्ता प्रजिमा 19 कि.मी.51/500 मध्ये पुलाचे बांधकाम करणे. 48 लक्ष, बांधकाम विभाग,जिल्हा परिषद,बीडमधुन इजिमा 48 ते रामा 211 (52) चौसाळ्याजवळ (भिमाशंकर सह.सा.कार.) रस्ता डांबरी नुतनी करणे. सा.क्रं.0/00 ते 3/00 ता.बीड 50 लक्ष, रामा 64 ते लोणीघाट-वाढवणा-पिंपळगाव-चौसाळा रस्ता डांबरी नुतनीकरण करणे सा.क्रं.0/00 ता.बीड 50 लक्ष, बारेखेड रामा 64 ते गोलंग्री रस्ता सुधारणा करणे. 10 लक्ष, अंजनवती ते येडेवस्ती रस्ता सुधारणा करणे. 10 लक्ष चौसाळा येथे जि.प.शाळा इमारत खोल्या बांधकाम करणे. (लोकार्पण) 25 लक्ष, अंजनवती उपकेंद्र दुरूस्ती करणे. 3 लक्ष, खडकीघाट उपकेंद्र दुरूस्ती करणे. 3 लक्ष, लोणीघाट उपकेंद्र दुरूस्ती करणे. 3 लक्ष, बोरखेड उपकेंद्र दुरूस्ती करणे. 3 लक्ष, खडकीघाट पशु वैद्यकीय दवाखाना दुरूस्ती करणे. 25 लक्ष, देवीबाभळगाव शाळा खोली बांधकाम करणे. 8 लक्ष, हिंगणीखुर्द शाळा खोली बांधकाम करणे. 8 लक्ष, पालसिंगण शाळा खोली बांधकाम करणे. 8 लक्ष, पालसिंगण रस्ता सुधारणा करणे. 12 लक्ष, देवीबाभुळगाव स्मशानभुमी बांधकाम करणे. 5 लक्ष, जेबापिंप्री स्मशानभुमी बांधकाम करणे. 5 लक्ष, चौसाळा स्मशानभुमी बांधकाम करणे. 5 लक्ष चौसाळा,वानगाव,बोरखेड,अंजनवती,पालसिंगण,रौळसागव,देवीबाभुळगाव,गोलंग्री येथे सार्वजनिक शौचालय बांधकाम प्रत्येक 3 लक्ष एकूण 23 लक्ष, जलसंधारण विभाग,बीडमधुन हिंगणी बु. येथे को.प.ब.बंधारा करणे. 1 कोटी, चौसाळा येथे गेटेड बंधारा करणे. 33 लक्ष, जेबापिंप्री येथे गेटेड बंधारा करणे. 42 लक्ष, देवीबाभुळगाव येथे गेटेड बंधारा करणे. 41 लक्ष व 25 15 अंतर्गत दोन कोटी रूपयांच्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,चौसाळा सर्कलच्या वतीने करण्यात आले आहे.
आज बीडमधील विकास कामांस
केली जाणार सुरूवात
शहरात व ग्रामीण भागात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे होत असतांना शहरातील शाहुनगर,पेठ बीड व माने कॉम्प्लेक्स परिसरातील पावणे दोन कोटी रूपयांच्या विकास कामांची सुरूवात आज शनिवार दि.18 डिसेंबर 2021 रोजी पासून होणार आहे. या कामांचा शुभारंभ माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅड.डी.बी.बागल यांच्या उपस्थिती होणार आहे. बीड शहरात व ग्रामीण भागात आ.संदिप भैय्यांनी विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. पेठ बीड बुरूड गल्लीमध्ये अतुल कुलकर्णी यांचे घर ते काशीनाथ शिंदे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणेे. शाहुनगर भागातील प्रभाग क्र.9 बीड येथील पांगरी रोडजवळील तांबोळी यांचे घर ते सय्यद मुसा यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे., प्रभाग क्र.10 उमाकिरण हॉलजवळील पुजा हुलजुते ते सुरेखा गायकवाड यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे., प्रभाग क्र.13 मध्ये माने कॉम्प्लेक्स ते सुरेशराव काळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे., प्रभाग क्र.13 मध्ये अरूण भस्मे यांचे घर ते केसोना गॅस एजन्सी (माने कॉम्प्लेक्स भाग) सिमेंट रस्ता करणे., प्रभाग क्र.13 मध्ये कल्याण सानप ते धसे नर्सिंग यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे अशा एकूण पावणे दोन कोटी रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमास प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,बीडच्या वतीने करण्यात आले आहे.