Uncategorized

मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ, सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अंबाजोगाई: मुलगी झाली म्हणून विवाहित महिलेचा छळ करून तीला घराबाहेर हाकलून दिल्याने तिने पती सासू, सासरा, दीर, जाऊ यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील एका मुलीचा विवाह बी़ड येथे झाला होते. यादरम्यान तीला मुलगी झाली. मुलगी झाल्यामुळे तिचा पती, सासू-सासरे, दिर, जाऊ यांनी तिचा शारीरीक व मानसीक छळ सुरू केला. किरकोळ कारण काढून आई- वडीलांना शिव्या देणे, तिला उपाशी ठेवणे, माहेराहून पैसे आन असे म्हणून तिला घराबाहेर हाकलून दिले. त्रासाला वैतागून पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून जाबेर शौकत अतार ( नवरा), शौकत आतार (सासरा), समीना शौकत अतार (सासू) इम्रान शौकत अतार (दीर), फजीला इम्रान अतार (जाऊ) व बुशरा अकबर अतार या सहा जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!