बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : मागच्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपअभियंत्यांची पदे रिक्त होती, शाखा अभियंत्यांकडे त्या पदांचा अतिरिक्त पदभार होता. अखेर बांधकाम विभागातील रिक्त पदांची घरघर सुटली आहे. राज्यातील 583 शाखा अभियंत्यांना उप अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली आहे. यामुळे बीड जिल्ह्याला पंधरा उपअभियंता मिळाले आहेत.
बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला सहा उपअभियंता मिळाले आहेत. यामध्ये बीडला पोपट जोगदंड, अंबाजोगाई सुनिल चांदवडकर, आष्टी बाळासाहेब खेडकर, पाटोदा बी.एम. राजपुत, गेवराई सुभाष उड्डान आणि माजलगावला सुनिल मुटकुळे यांची उपअभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला आठ उपअभियंता मिळाले आहेत. यामध्ये बीडला बोराडे, वडवणी प्रविणकुमार लावंड, धारूर नारायण आवधुत, पाटोदा संजय साबळे, केज युवराज मळेकर, अंबाजोगाईला श्याम केंद्रे, परळी संजय मुंडे, बालाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी बालाजी शिंदे हे उप कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. तर मुख्यमंत्री ग्रामसडक कार्यालयाला करीम बाबूलाल शेख यांची उपअभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे. दरम्यान जिल्ह्याला 15 उपअभियंता मिळाल्यामुळे कामांना गती मिळणार आहे.