Uncategorized

वसुली सरकारला लवकर जाग नाही आली तर महावितरण कंपनीच्या विरोधात जागरण गोंधळ आंदोलन करणार – रमेश पोकळे


बीड दि: 9 (प्रतिनिधी) नैसर्गिक संकटाने अडचणीत आलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीज पूरवठा महावितरणीने खंडीत केला असून अनेक वेळा निवेदन देऊन अद्यापही वीज पूरवठा पूर्ववत केला नाही. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करून सक्तीची वीजबिल वसुली मोहीम चालू करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महावितरण कंपनी आणि सरकार करत आहे. असा घणाघाती आरोप करून वसुलीप्रिय सरकारने व महावितरण कंपनीने कृषी पंपाचा विद्युत पुरवठा पूर्ववत न केल्यास महावितरण कार्यालयात जागरण गोंधळ आंदोलन करणार असा इशारा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशभाऊ पोकळे यांनी मांजरसुंबा येथील बैलगाडी चक्काजाम अंदोलनात बोलताना दिला आहे.
बीड जिल्ह्यातील महावितरण कंपनीने कृषी पंपाची वीज तोडणी व सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी आणि तात्काळ वीज जोडणी करण्यात यावी तसेच खरीप हंगामातील अतिवृष्टीग्रस्त अनुदानापासून मांजरसुंबा मंडळातील वगळण्यात आलेल्या 23 गावांना अनुदान देण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी सर्वपक्षीय व सामाजिक चळवळीतील सर्वाच्या वतीने बैलगाडीसह चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना रमेशभाऊ पोकळे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच अतिवृष्टीमुळे संकटात आला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक अतिवृष्टीने गेले असून आता रब्बीचे पीक देखील महावितरण कंपनीने आणि सरकारच्या वीज तोडणी करून सक्तीच्या वीज बिल वसुली मोहीमेमुळे हातातून जाते की काय यामुळे शेतकरी चिंतेत असून आता तो आक्रमक झाला आहे. शेतकऱ्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन देखील वीज जोडणी झाली नाही. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ,शेतकरी वीज बिल भरण्यास तयार असताना देखील अवाच्या-सव्वा वीज बिल आकारणी करून शेतकऱ्यांची लूट हे सरकार आणि महावितरण कंपनी करत आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक अतिवृष्टीने गेले असताना किमान रब्बीचे पीक तरी हातात पडेल या आशेवर शेतकरी असताना पिकांना पाणी देण्याच्या हंगामामध्ये कृषिपंपाची वीज खंडित करून शेतकऱ्यांना संकटात टाकण्याचे पाप महावितरण कंपनीने थांबवावे. शेतकऱ्यांचा संय्यमाचा अंत महावितरणने पाहू नये, तेंव्हा सरकारने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची सक्तीची वीजबिल वसुली मोहीम तात्काळ थांबून शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावी अन्यथा महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांच्या कार्यालयात शेतकर्यासह जागरण गोंधळ आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशभाऊ पोकळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे डॉ. गणेशजी ढवळे, स्वप्निल भैय्या गलधर, बाळासाहेब मोरे, येडे फौजी, अशोकदादा रसाळ, अॅड बळबंत कदम, तुळशीदास महाराज शिंदे, विष्णू महाराज घरत, मस्सु जाधव ,सौ वैशालीताई प्रदिप चौरे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी यांनी आदोंलनात बोलताना दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!