Uncategorized

तुकडमोडी नदी पात्रालगतच्या अवैध वाळू साठ्यावर धाड, 23 ब्रॉस वाळू जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आणली, मंडळाधिकारी नितीन जाधव यांच्या पथकाची कारवाई


बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाची वाळूच्या अवैद्य साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तुकडमोडी नदी (मौजे बराणपुर ता.जि.बीड) येथे 23 ब्रास (तेवीस ब्रास) अवैध उत्खनन केलेली नदीपात्रालगतची वाळू जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणण्यात आली आहे. तसेच या कारवाईमध्ये एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे ते अवैद्य वाळू वाहतुकीच्या उद्देशाने चोरीच्या मार्गाने वाहतुकीसाठी वापरण्या येणारे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कार्यवाही करण्यात आली आहे. सादर कार्यवाही मंडळ अधिकारी श्री.नितीन जाधव, तलाठी श्री.उमेश खिंडरे, श्री.अरुण गुरसाली, श्रीमती ज्योती बोदवड यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!