Uncategorized

आजपासून 2021 च्या विम्याचे 360 कोटी येणार शेतकर्‍यांच्या खात्यात, जिल्ह्यातील पाच लाख 59 हजार 532 शेतकर्‍यांना विम्याची मदत केली निश्‍चित


बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यात 2021 च्या खरीप हंगामात झालेल्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते, त्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती. त्यांच्यासाठी आता विमा कंपनीने मोठी घोषणा केली आहे. विमा कंपनीने जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण पूर्ण केले असून मंडळ निहाय पीका जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासून खरीप 2021 च्या विम्याचे 360 कोटी रूपये बीड जिल्ह्यातील पाच लाख 59 हजार 532 शेतकर्‍यांच्या खात्यावर येणार आहेत. दरम्यान खरीप 2020 च्या पीक विम्याचा पेच मात्र कायमच आहे.
बीड जिल्ह्यासाठी खरीप पीक विमा घेतलेल्या अग्रीकल्चरल इन्शुअरन्स कम्पनी ऑफ इंडियाचे व्यवस्थापक एस. व्ही. शेट्टी जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठविले असून त्यात सॅम्पल सर्व्हेच्या आधारे बीड जिल्ह्यात 360 कोटींचा क्लेम निश्चित करण्यात आल्याचे म्हटले आहे. विमा कंपनीने मंडळ आणि पीक निहाय नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविला आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सॅम्पल सर्वे आधारित ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यानुसार आजपासून विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष खात्यावर येणार आहे. ही मदत खरीपातील सर्वच पीकांसाठी असणार आहे. या मदतीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे.

महिणाभरापासून सुरू होती
मंजूरीची कारवाई
बीड जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामात मोठठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, यामध्ये शेतकर्‍यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले, याअनुषंगानेच सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना 25 टक्के अ‍ॅग्रीम मंजूर करण्यात आले होते. यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिडशे कोटी प्राप्त झाले. त्या दिडशे कोटीनंतर आणखी 360 कोटी रूपये आज दि. 10 डिसेंबरपासून शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत.

आता 2020 च्या विम्यात
इमानदारी हवी
खरीप 2021 च्या विम्याचे सर्व पैसे विमा कंपनीच्या हातात आहे, त्यामुळेच शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळत आहे. 2020 च्या विम्याची रक्कम विमा कंपनीकडून राज्य सरकारच्या तिजोरीत गेलेली आहे, त्यामुळेच ती शेतकर्‍यांना अद्यापही प्राप्त झालेली नाही, ज्याप्रमाणे विमा कंपनीे शेतकर्‍यांसोबत ईमानदारी दाखविली अगदी त्याचप्रमाणे आता राज्य सरकारनेही ईमानदारी दाखवून शेतकर्‍यांना खरीप 2020 च्या विम्याचे पैसे तात्काळ अदा करावेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!