Uncategorized

देशासाठी बलीदान देणारे वीर जवान अविनाश आंधळेंसमोर जिल्हा नतमस्तक, आंधळेंचे पार्थिव जिल्ह्यात दाखल, एक तासात होणार अंत्यविधी


ुबीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील हिंगणी (बु) येथील अविनाश कल्याण आंधळे हा जवान दिल्लीनजीक शहिद झाला. 29 वर्ष वय असलेल्या अविनाश यांची 6 वर्षांपूर्वी सैन्यदलात निवड झाली होती. ुदिल्लीनजीक कर्तव्यावर असताना मागच्या दोन दिवसांपुर्वी त्यांचे निधन झाले. अविनाश यांचे वडील कल्याण आंधळे हे शेतकरी आहेत. अविनाश यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी अविनाश यांचे पार्थिव बीडमध्ये दाखल झाले त्यानंतर त्यांचे पार्थिव हिंगणी (बु) ता. बीड येथे आणण्यात आले आहे. एक तासात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अविनाश आंधळे या जवानाच्या निधनाने हिंगणी गावात शोककळा पसरली आहे. आंधळेंचे पार्थिव बीड येथे आले असता त्यांना भाजपच्या वतीने श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. यावेळी भाजपा संघटन सरचिटनीस प्रा देविदास नागरगोजे, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सलीमभाई जहांगीर, भाजपा बीड शहराध्यक्ष भगीरथ दादा बियानी,विक्रांत बाबा हजारी,डॉक्टर लक्ष्मण जाधव,प्रदीप बांगर,महादेव मुंडे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!