Uncategorized

कारखानास्थळी ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ लसीकरणाची सोय करा, बीड जिल्ह्यातील कामगारांच्या आरोग्य रक्षणासाठी खा. प्रीतमताई मुंडेंचे आरोग्य मंत्र्यांना पत्र

बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : ऊसतोड कामगारांच्या प्रत्येक प्रश्‍नांसाठी मुंडे भगिणी मोठा लढा देत आहेत. त्यामुळेच त्यांचा प्रत्येक प्रश्‍न सोडविण्यासाठी त्या दोघीही सर्वात पुढे असतात, सध्या ओमिक्रॉन या भयाणक अशा व्हायरसचे संकट महाराष्ट्र, देशासह संपूर्ण जगावर घोंघावत आहे, परिणामी या संकटात ऊसतोड कामगारांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, यासाठी खा.प्रीतमताई मुंडे सरसावल्या आहेत. त्याअनुषंगानेच त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाच डिसेंबर रोजी पत्र पाठवून ऊसतोड कामगारांसाठी एक महत्वाची मागणी केली आहे. कारखानास्थळीच ऊसतोड कामगारांसाठी लसीकरणाची सोय तात्काळ करावी, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या एका पत्रामुळे बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना मोठा आधार मिळणार असून सरकारला कामगारांसाठी लसीकरणाची सोयच करावी लागणार आहे. बीड जिल्ह्यातून महाराष्ट्रासह इतर राज्यातही ऊसतोडीसाठी लाखोंच्या संख्येने मजूर स्थलांतरीत झालेले आहेत. सध्याच्या या काळात ऊसतोड मजूरांना साखर कारखानास्थळी कोरोना प्रतिबंधात्मक लस देणे आवश्यक आहे. तरी संबंधित ठिकाणी आरोग्य यंत्रणा व साखर कारखान्यांना याबाबत आदेश देवून कार्यवाही करावी, असे खा. प्रीतमताई मुंडे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!