माजलगाव : राजेवाडी येथील मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड आणि याच शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षिका श्रीमती राठोड यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला असून मानसिक तणावाखाली आलेल्या सदर शिक्षिकेने घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान केल्यामुळे एकच खळबळ उडाली असून प्रकरण गंभीर वळण घेत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांच्यातील वादामुळे तसेच गावातील लोकांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे राजेवाडी येथील प्राथमिक शाळा ही मागील चार दिवसांपासून बंद पडली असून याबाबत सोमवारी सर्वांनाच खुलासा सह हजर राहण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी नोटीस बजावली आहे. विद्यार्थ्यांची होत असलेले नुकसान पाहता यांच्यातील वाद संपुष्टात आणण्याचा येथील गट शिक्षण अधिकारी यांनी प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही तसेच या दोघांनाही चौकशीअंती निलंबित करण्याबाबत अहवाल गटशिक्षण अधिकारी यांनी यापूर्वीच पाठवलेला आहे. शाळा बंद होणे तसेच मुख्याध्यापकाकडून होत असलेल्या त्रासाला आणि राजकीय हस्तक्षेपामुळे पेटलेल्या राजेवाडी शाळेच्या शाळेच्या वादंगामुळे यातील महिला शिक्षिका यांनी मानसिक तणावातून शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शाळेवरच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेथे उपस्थित असलेल्या दोन शिक्षकांनी तात्काळ शिक्षिकेला येथील एका खाजगी दवाखान्यात आणल्याचे समजते यामुळे एकाच खळबळ उडाली असून सदर प्रकरणाने आता गंभीर वळण घेतल्याचे दिसून येत आहे.