बीड अंबाजोगाई

माजी आ.संगीता ठोंबरे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर

अंबाजोगाई : केज मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे या पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची चिन्हे असुन राष्ट्रवादी काँग्रेस च्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
काही कारणास्तव राजकारणा पासुन अलिप्त झालेल्या केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे या मतदारसंघात विविध कार्यक्रमाना हजेरी लावत असल्याने संगीता ठोंबरे या पुन्हा राजकारणात सक्रिय होणार नाहित असे वाटत होते परंतू त्या परत मतदारसंघात फिरत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.
कॉंग्रेस मधुन राष्ट्रवादी मधे प्रवेश केलेले अंबाजोगाईचे नगराध्यक्ष राजकीशोर मोदी यांच्या मुलाच्या वाढदिवसा निमित्त आयोजीत कार्यक्रमात त्या आवर्जुन उपस्थित होत्या.या कार्यक्रमात माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या भोवताली भाजप,राष्ट्रवादीच्या नेत्यांची,कार्यकर्त्याची गर्दी पहायला मिळाली.मा.आ.संगीता ठोंबरे यांची क्रेझ नेत्यात,कार्यकर्त्यात अजूनही तेवढीच आहे हे या निमित्ताने दिसून आले.
माजी आमदार संगीता ठोंबरे या भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस मधे प्रवेश करनार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.या डिसेंबर महीन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राजकिशोर मोदी यांनी मेळावा आयोजित केल्याची माहिती असुन याच मेळाव्यात जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचे प्रवेश होण्याची शक्यता आहे.या मेळाव्यात माजी आमदार संगीता ठोंबरे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हाती घेतील अशी चर्चा आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!