बीड माजलगाव

सत्यनारायण होताच नवरदेवाने केली आत्महत्या;नित्रुड येथील घटना

माजलगाव -तालुक्यातील नित्रुड येथील शेतकरी पांडुरंग डाके याने सोमवार रोजी सत्यनारायण होताच शेतात जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पांडुरंग रामकिसन डाके वय 26 हा शेती करत होता. याचे शनिवार रोजी माजलगाव येथे थाटामाटात लग्न झाले होते. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचा सत्यनारायण देखील झाला. सत्यनारायण झाल्यानंतर पाहुणेरावळे व गावातील अनेक लोक घरी जेवण करत होते. पांडुरंग याने जेवण करून 3 वाजता कोणालाही न सांगता शेताकडे गेला व त्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याचे प्रेत झाडाला लटकत असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी याबाबत त्यांच्या घरी कळवले. त्यानंतर पंचनामा होऊन त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.पांडुरंगने आत्महत्या का केली ? याचे अध्याप कारण सापडू शकले नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!