Uncategorized

शिरुर नगर पंचायतवर भाजपाचा झेंडा फडकणार – राजेंद्र मस्के,भाजपा उमेदवारीसाठी ईच्छुकांची गर्दी

InboxWrite

शिरुर प्रतिनिधी

बीड जिल्ह्यामध्ये आष्टी, पाटोदा, शिरुर, वडवणी व केज या नगरपंचायतीच्या निवडनुका घोषीत झाल्या असुन 1 डिसेंबर पासुन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शना नुसार नगर पंचायत निवडनुकीत यश संपादनासाठी रणनीती आखली आहे. नगरपंचायत निहाय प्रभारींची नियुक्ती केली आहे. वडवणी – आ.लक्ष्मण पवार, शिरुर का. – जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, पाटोदा – श्री.आर.टी. देशमुख, आष्टी – ॲड.सर्जेराव तांदळे, केज – श्री.रमेशराव आडस्कर या भाजपा जेष्ठ नेत्यांची प्रभारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुक जिंकण्यासाठी कार्यकर्ते व नेते एकदिलाने कामाला लागले आहेत. या अनुशंगाने काल शिरुर येथे काल आ.सुरेश अण्णा धस, राजेंद्र मस्के, मा.भिमराव धोंडे यांनी संयुक्त रित्या मुलाखती घेऊन महत्वपुर्ण कार्यकत्यांची बैठक घेतली. प्रत्येक वार्डामध्ये आठ ते दहा कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. या मध्ये योग्य उमेदवार निश्चित करण्यासाठी नेते मंडळींना जिकरीचे ठरले आहे. या वेळी आ.सुरेश अण्णा धस, दशरथ वनवे, जि.प.सदस्य रामराव खेडकर, शिवाजी पवार, डॉ.मधुसुधन खेडकर, पस सदस्य प्रकाश खेडकर, माजी.नगराध्यक्ष राहिदास पा. गाडेकर, नगराध्यक्ष दत्ता पा. गाडेकर, प्रल्हाद धनगुडे, किशोर खोले, एम.एन बडे, भगवान सानप, विवेक पाखरे, भारत खरमाटे, सुरेश उगलमोगले या मान्यवरासह ईच्छुक उमेदवार व कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थितीत होते.

या बैठकी दरम्यान बोलताना राजेंद्र मस्के म्हणालेकी शिरुर का. नगर पंचायत निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची असुन या निवडणुकीत विजय प्राप्त करण्याचा संकल्प सर्वनेते मंडळी व कार्यकर्त्यांनी केला आहे. लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी नगर पचायत निवडणुकीच्या अनुशंगाने जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. आ.सुरेश अण्णा धस व माजी.आ.भीमशेन धोंडे यांच्यात कोणताही मत भेद राहिलेला नाही. पक्षातील नेत्यांनी गट तट बाजुला ठेऊन प्रत्येक नगरपंचायती वर  भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचा कानमंत्र दिला आहे. कार्यकर्त्यांसाठी ही निवडणुक महत्वाची असुन सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे असे अवाहन केले. सध्या राज्यात महविकास आघाडीचे सरकार असुन या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. सरकार मधील मंत्री फक्त आणि फक्त भ्रष्टाचारात गुंतले आहेत. तिनही पक्षातील नेते विकासावर बोलत नाही. राज्याच्या हीताचे धोरण पुढे आणत नाहीत. घोटाळे आणि भ्रष्टाचारामुळे चौकशीच्या घेऱ्यात अडकले आहेत. अनेक मंत्र्यावर फौजदारी गुन्हे दाखल होत आहे. ही बाब राज्यासाठी गंभीर आहे. भ्रष्टाचार आणि स्वार्थापुढे राज्य कर्त्यांना विकासाकडे लक्ष देण्यास वेळ उरलेला नाही. राज्य कर्ते या पद्धतीने वागत असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न जनते समोर पडला आहे. भाजपा सरकारच्या काळात तत्कालीन पालक मंत्री पंकजाताई मुंडे यांनी शिरुर नगर पंचायत व तालुक्यातील विकास कामासाठी भरिव निधी दिला. या निधी मुळे शिरुर नगरपंचायती मध्ये निर्माण झालेला विकास आपल्याला दिसत आहे. परंतु आघाडी सरकार आल्यानंतर विकास निधी सोडाच पण फक्त विकासात खोडा घालण्याचे काम सुरु आहे. या विकासाच्या मुद्यावर आपण जनतेसमोर जानार आहोत. नेत्यामधील मतभेद संपले असुन सर्व एकजुटीने कामाला लागले आहेत. त्यामुळे शिरुर नगर पंचायती वर भाजपाचा झेंडा फडकल्याशीवाय राहनार नाही. असा विश्वास राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!