Uncategorized

पंकजाताई मुंडेंचे परळीत ‘वेलकम टू स्कुल’,प्राथमिक शाळेला दिली भेट ; पंकजाताईंच्या स्वागताने बच्चे कंपनी खुश

परळी ।दिनांक ०१।
पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आजपासून सुरू झाले, शाळेच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शहरातील प्राथमिक शाळेला भेट दिली आणि विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, त्यांच्या स्वागताने बच्चे कंपनी एकदम खुश झाली.

कोरोनाची लाट काही प्रमाणात ओसरल्यामुळे सरकारने शाळा सुरू केल्या आहेत. आजपासून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू झाले, पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती होती. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सकाळी वैद्यनाथ प्राथमिक विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले तसेच त्यांच्याशी संवादही साधला. त्यांच्या भेटीने बच्चे कंपनीमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून आला.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, प्रकाश जोशी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, नगरसेवक पवन मुंडे, नगरसेविका उमाताई समशेट्टे, महादेव इटके, नरेश पिंपळे, मोहन जोशी, पवन मोदाणी, विकास हालगे, आश्विन मोगरकर, पवन तोडकरी आदी उपस्थित होते.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!