Uncategorized

दै. लोकाशा दणक्याने महसूल प्रशासन जागे पोलिस प्रशासन मात्र झोपेतच,महसूल पथकाची धडक कारवाई एक हायवा सह दोन ट्रक पकडले,५०लाखांचा मुद्देमाल जप्त, सुरळेगाव येथे कारवाई

राक्षसभुवन दि. लोकाशा न्युज दरम्यान अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या हायवासह दोन ट्रक वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . हि कारवाई गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री केली . दरम्यान मागील काही महिण्यापासून महसूल प्रशासन अवैध वाळू वाहतूकीविरोधात सातत्याने कारवाई करत असून यामुळे वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत . गेवराई तालुक्यातून गेलेल्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा करुन ती चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते . नदीपात्रात पाणी असताना देखील वाळू माफिया केनीच्या सहाय्याने दिवसभर वाळू उपसा करुन ती रात्री हायवा व ट्रकम 1 चोरट्या मार्गाने वाहतूक करतात . याविरोधात महसूल , पोलिस प्रशासन सातत्याने कारवाई करत असताना देखील वाळू माफिया या कारवायांना भीक घालत नसून महसूल , पोलिस अधिकाऱ्यांवर पाळत ठेवून वाळू उपसा व वाहतूक करतात . बुधवारी रात्री अशाचप्रकारे गेवराई तालुक्यातील सुरळेगाव याठिकाणाहून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार सचिन खाडे यांनी पथकासह त्याठिकाणी धाड टाकली . यावेळी एक हायवा , दोन ट्रक वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . हि वाहने चकलांबा पोलिस ठाण्यात लावण्यात आली आहेत .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!